एकदा फुल टँक केला तर ७०० किमी धावणार; 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त बाईक, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 14:00 IST2026-03-04T13:59:55+5:302026-03-04T14:00:44+5:30

ही बाईक एकदा पूर्ण टँक भरल्यानंतर ७०० किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देते. यामुळे ती दैनंदिन ऑफिस किंवा प्रवासासाठी बेस्ट ठरते. 

Once you fill the tank, it will run 700 km; TVS Radeon is the cheapest bike in the country, know details | एकदा फुल टँक केला तर ७०० किमी धावणार; 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त बाईक, किंमत फक्त...

एकदा फुल टँक केला तर ७०० किमी धावणार; 'ही' आहे देशातील सर्वात स्वस्त बाईक, किंमत फक्त...

नवी दिल्ली - भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा एक बाईक उपलब्ध आहेत परंतु जर तुम्ही कमी बजेटमध्ये अशी एखादी बाईक शोधताय, जी तुम्हाला चांगला माइलेज देईल तर त्यासाठी TVS Radeon एक चांगला पर्याय ठरू शकतो. ही देशातील सर्वात स्वस्त दुचाकीपैकी एक आहे ज्याची एक्स शोरूम किंमत ५५, १०० रुपये इतकी आहे. मार्केटमध्ये या दुचाकीची स्पर्धा Bajaj Platina आणि Hero Splendor Plus यासारख्या दुचाकींसोबत आहे.

TVS Radeon मध्ये १०९.७cc ड्युरालाइफ इंजिन आहे. ते इको-थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञानासह येते, जे ८.०८ bhp पॉवर आणि ८.७ Nm टॉर्क जनरेट करते. ४-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेली ही बाईक शहरातील वाहतुकीत सुलभ राइड आणि सहज हँडलिंग देते. TVS Radeon चा टॉप स्पीड अंदाजे ९० किमी प्रतितास आहे.

TVS Radeon मायलेज आणि रेंज

TVS Radeon च्या मायलेजबाबत बोलायचे झाले तर कंपनीच्या दाव्यानुसार तिचा मायलेज ७३.६८ किमी प्रति लिटर आहे, तर प्रत्यक्षात वास्तविक जगातला मायलेज सरासरी ६२-७० किलोमीटर प्रति लिटर आहे. ही बाईक एकदा पूर्ण टँक भरल्यानंतर ७०० किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देते. यामुळे ती दैनंदिन ऑफिस किंवा प्रवासासाठी बेस्ट ठरते. 

जाणून घ्या बाईकची वैशिष्ट्ये 

TVS Radeon मध्ये रिअल-टाइम मायलेज, LED DRL, मोठी सीट, USB चार्जिंग, साइड स्टँड कट-ऑफ, सेमी-डिजिटल कन्सोल आणि हाय ग्राउंड  क्लिअरन्स आहे. ग्रामीण भागात किंवा खडबडीत रस्त्यांवर रेडियन अधिक आरामदायी वाटते. टीव्हीएस बाईकमध्ये पुढच्या बाजूला १३० मिमी ड्रम ब्रेक आहे आणि टॉप व्हेरिएंटमध्ये २४० मिमी फ्रंट डिस्क ब्रेक आहे. मागील चाकासाठी ११० मिमी ड्रम ब्रेक वापरला आहे. सर्व प्रकारांमध्ये १८-इंच अलॉय व्हील्स वापरल्या जातात आणि बाईकमध्ये कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम देखील आहे.

Web Title : TVS Radeon: किफायती बाइक, फुल टैंक में 700 किमी की रेंज!

Web Summary : TVS Radeon, ₹55,100 की शुरुआती कीमत पर, 73.68 kmpl का माइलेज देती है। 109.7cc इंजन और USB चार्जिंग जैसे फीचर्स के साथ, यह दैनिक यात्रा के लिए उत्तम है, जो एक फुल टैंक पर 700 किमी से अधिक की रेंज प्रदान करती है।

Web Title : TVS Radeon: Affordable, fuel-efficient bike delivers 700km range per tank.

Web Summary : TVS Radeon, a budget-friendly bike at ₹55,100, boasts 73.68 kmpl mileage. Its 109.7cc engine and features like USB charging make it ideal for daily commutes, offering a 700km+ range on a full tank.