Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 18:51 IST2025-09-30T18:51:08+5:302025-09-30T18:51:56+5:30
Indias First Self-Driving Electric Three-Wheeler: ओमेगा सेकी मोबिलिटीने जगातील पहिली ड्रायव्हरलेस ऑटोनॉमस इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर भारतीय बाजारात लॉन्च केली.

Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
ओमेगा सेकी मोबिलिटीने जगातील पहिली ड्रायव्हरलेस ऑटोनॉमस इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर भारतीय बाजारात लॉन्च केली. या रिक्षाची सुरुवाती किंमत ४ लाख रुपये आहे. दरम्यान, विमानतळ, स्मार्ट कॅम्पस, औद्योगिक उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणी अशा कमी अंतराच्या वाहतुकीसाठी ड्रायव्हरशिवाय ही रिक्षा सहजपणे चालवता येते. कंपनीचे संस्थापक उदय नारंग यांच्या मते, ही जगातील पहिली ड्रायव्हरलेस ऑटोनॉमस इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर आहे, जी भारतीय वाहतुकीचे भविष्य निश्चित करणारे एक पाऊल असेल.
मिळालेल्या माहितीनुसार, ही रिक्षा पॅसेंजर आणि कार्गो अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आली. पॅसेंजर व्हेरिएंटची किंमत ४ लाख रुपये आहे. तर, कार्गो व्हेरिएंटची किंमत ४.१५ लाख आहे. कार्गो व्हेरिएंट अद्याप लॉन्च झालेला नाही. परंतु तो लवकरच बाजारात दाखल होण्याची अपेक्षा आहे.
या रिक्षात अनेक नवीन आणि अॅडवॉन्स फीचर्स देण्यात आले असून ही रिक्षा एका चार्जवर १२० किमी धावणार, असा दावा कंपनीकडून करण्यात आला. यात मल्टी-सेन्सर नेव्हिगेशन आणि रिमोट सेफ्टी कंट्रोल्स आहेत. ही इलेक्ट्रिक ऑटोरिक्षा विमानतळ, टेक पार्क, स्मार्ट शहरे, कॅम्पस आणि औद्योगिक केंद्रांसाठी डिझाइन केलेली आहे.