शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या वाहनांची होणार डोकेदुखी, नूतनीकरण आठ पट महागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 06:42 IST

जुने वाहन भंगारात काढल्यास नवीन वाहनाच्या खरेदीत ५ टक्के सवलत देण्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले आहे. यापुढे जुने वाहन चालविणे महाग हाेणार आहे. राेड टॅक्समध्ये खासगी वाहनांना २५ टक्के, तर व्यावसायिक वाहनांना १५ टक्के सवलत देण्यासही गडकरींनी सुचविले आहे. 

नवी दिल्ली : केंद्र सरकार जुन्या वाहनांना रस्त्यांवरून हद्दपार करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. एकीकडे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन भंगार धाेरणाबाबत संसदेमध्ये माहिती दिली. तर दुसरीकडे सरकारने या धाेरणाला पूरक अधिसूचना जारी करून १ ऑक्टाेबरपासून जुन्या वाहनाच्या नाेंदणीच्या नूतनीकरणासाठी शुल्कात माेठी वाढ केली आहे. त्यानुसार नूतनीकरणासाठी सुमारे ८ ते १० पट जास्त रक्कम माेजावी लागणार आहे.  (Older vehicles will have headaches, renewal will be eight times more expensive)

जुने वाहन भंगारात काढल्यास नवीन वाहनाच्या खरेदीत ५ टक्के सवलत देण्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले आहे. यापुढे जुने वाहन चालविणे महाग हाेणार आहे. राेड टॅक्समध्ये खासगी वाहनांना २५ टक्के, तर व्यावसायिक वाहनांना १५ टक्के सवलत देण्यासही गडकरींनी सुचविले आहे. 

टाेलनाके हाेणार हद्दपारसर्व टाेलनाके हटविण्याबाबत सरकारने याेजना आखल्याचे गडकरी म्हणाले. त्यांनी सांगितले की, जीपीएसवर आधारित टाेलवसुलीची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून वाहनांचे छायाचित्र काढण्यात येईल. त्याआधारे वाहनाने महामार्गावर प्रत्यक्ष किती अंतर कापले, यावरून टाेल आकारण्यात येईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

पुनर्नाेंदणी महागडीव्यावसायिक वाहनांना १५ वर्षांनी, तर खासगी वाहनांना २० वर्षांनी फिटनेस प्रमाणपत्र घेऊन पुनर्नाेंदणी करणे आवश्यक राहणार आहे. पुनर्नाेंदणीचे शुल्क हे वाहनांच्या मूळ नाेंदणीच्या तारखेपासून आकारण्यात येईल.

खासगी वाहनाच्या नाेंदणीचे नूतनीकरण न केल्यास दंड - दरमहा ₹३०० ते ₹५००

व्यावसायिक वाहनांना दरराेज - ₹५० दंड भरावा लागणार आहे. 

व्यावसायिक वाहनांना ८ वर्षांनी दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे बंधनकारक राहणार आहे. फिटनेसमध्ये फेल हाेणाऱ्या वाहनांची नाेंदणी आपाेआप रद्द हाेणार आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाcarकार