शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

दर दोन सेकंदाला...एक! Ola ची Electric scooter येतेय; फक्त 5 मिनिटांत फूल चार्ज होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 2:47 PM

Ola's electric scooter will hit Indian Market soon: ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा अधिकृत फोटो समोर आला आहे. पुढील काही महिन्यांत ही स्कूटर भारतात लाँच होईल. काही काळापूर्वी ओलाने Etergo ही कंपनी ताब्यात घेतली आहे.

भारतीय बाजारात ईलेक्ट्रीक स्कूटर एका मागोमाग एक अशा लाँच होऊ लागल्या आहेत. बजाज, टीव्हीएस, हिरो, इथर, ओकिनावासारख्या देशी-विदेशी कंपन्यांच्या स्कूटर आल्या आहेत. परंतू देशात कॅब सेवेद्वारे हातपाय पसरलेली ओला कंपनी (Ola Electric Mobility Pvt)मोठा धमाका करणार आहे. जगातील सर्वात मोठा ईव्ही स्कूटरचा प्लांट उभारण्यात येत असून त्यामध्ये दर दोन सेकंदाला एक ईव्ही स्कूटर तयार केली जाणार आहे. (Ola's 500-acre e-scooter factory in Bengaluru to make EV every 2 seconds)

सध्या बाजारात असलेल्या ईव्ही स्कूटरची रेंज ही 70 ते 100 च्या आसपास आहे. तर त्या चार्ज करण्यासाठीदेखील तासंतास लागतात. परंतू ओलाची स्कूटर अवघ्या 5 मिनिटांत फूल चार्ज होणार आहे. म्हणजेच पेट्रोल भरण्यासाठी रांगेत राहून ते पेट्रोल पंपावरून पैसे देऊन बाहेर पडण्याचा जो वेळ आहे त्यापेक्षा कमी वेळात ही स्कूटर चार्ज होणार आहे. तसेच या स्कूटरची रेंजही जास्त असणार आहे. या पहिल्या स्कूटरची झलक ओलाने दिली आहे. 

ओला इलेक्ट्रिक स्कूटरचा अधिकृत फोटो समोर आला आहे. पुढील काही महिन्यांत ही स्कूटर भारतात लाँच होईल. काही काळापूर्वी ओलाने Etergo ही कंपनी ताब्यात घेतली आहे. या कंपनीच्या जिवावरच ओला इलेक्ट्रीक स्कूटर घेऊन येत आहे. या स्कूटरमध्ये स्वॅपेबल हाय एनर्जी डेन्सिटी बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ही स्कूटर एका चार्जमध्ये 240 किलोमीटर जाण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एक्ट्रा बॅटरी बाळगली तर याची रेंज दुप्पट होणार आहे. या प्रक्रियेलाही केवळ ५ मिनिटांचा वेळ लागणार आहे. स्वॅपेबल बॅटरी म्हणजे डिस्चार्ज बॅटरीच्या जागी दुसरी बॅटरी लावता येते. इतर फिचर आता हळूहळू समोर येणार आहेत. परंतू ही सुविधा मोठमोठ्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. 

500 एकरावर प्रकल्पओला या स्कूटर बनविण्यासाठी बंगळूरूमध्ये 500 एकरावर भलामोठा प्रकल्प उभारण्याची तयारी करत आहे. यासाठी कंपनीच्या टॉपच्या पदाधिकाऱ्यांनी आंब्याची बाग असलेली जागा पाहिली आहे. या जागेत पुढील 12 महिन्यांत हा मोठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकरल्पात वर्षाला दोन दशलक्ष स्कूटर तयार केल्या जाणार आहेत. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleवीजेवर चालणारं वाहन