OLA नं ग्राहकांना फसवलं, ATHER ने घेतला संधीचा फायदा; जबरदस्त ऑफरमुळे विक्रीत दुप्पट वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:09 IST2025-11-20T14:08:38+5:302025-11-20T14:09:19+5:30
राज्यातील मुंबई, पुणे नागपूर यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या निमशहरी भागातही एथरने मार्केट वाढवले आहे.

OLA नं ग्राहकांना फसवलं, ATHER ने घेतला संधीचा फायदा; जबरदस्त ऑफरमुळे विक्रीत दुप्पट वाढ
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून OLA इलेक्ट्रिक दुचाकीमुळे अनेक ग्राहकांना आर्थिक तोटा बसल्याचं चित्र समोर आले आहे. ओलाने विक्री केलेल्या दुचाकी मोठ्या प्रमाणात दुरुस्तीअभावी धूळखात पडल्या आहेत. सोशल मीडियावर OLA विरोधात ग्राहकांनी बॉयकॉट OLA अशी मोहिम चालवली आहे. ओलाच्या खराब सेवेमुळे ग्राहकांचा ईलेक्ट्रिक वाहनांवरील विश्वास उडत असताना ATHER ने ग्राहकांना आकर्षिक करत जबरदस्त ऑफर दिल्या आहेत. त्यामुळे मागील तिमाहीत ATHER ला त्याचा चांगलाच फायदा झाल्याचं दिसून येते.
गेल्या ३ महिन्यात ATHER ने महाराष्ट्रात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश आणि ओडिशा यांचा समावेश असलेल्या मध्य भारतातील प्रदेशात एथरचा मार्केट शेअर ८.८ टक्क्याहून १४.६ टक्के इतका पोहचला आहे. त्यात महाराष्ट्राचं प्रामुख्याने मोठे योगदान आहे. केवळ २ तिमाहीत राज्याचा मार्केट शेअर ९.४ टक्क्यांवरून १४.६ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्रात ATHER चे ८० हून अधिक शोरूम आहेत आणि ४८० पेक्षा जास्त ठिकाणी चार्जिंग पाँईंट आहेत. राज्यातील मुंबई, पुणे नागपूर यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर या निमशहरी भागातही एथरने मार्केट वाढवले आहे.
इलेक्ट्रीक वाहन खरेदी करताना ग्राहकांच्या मनात सर्वात आधी येणारा प्रश्न म्हणजे स्कूटर खरेदी केल्यानंतर त्यानंतर ती खराब झाल्यास दुरुस्ती कशी होणार? त्यावर ATHER ने त्यांच्या प्रत्येक शोरूममध्ये एक सर्व्हिस सेंटर असल्याचं सांगितले आहे. त्यात १० किमी अंतरावरील २ शोरूमला मिळून १ सर्व्हिस सेंटर ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असते. त्यामुळे राज्यात जितके शोरूम आहेत तितकेच सर्व्हिस सेंटर असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आले. याशिवाय ATHER ची बॅटरी लाईफ उत्तम असून त्यातही ती ७-८ वर्ष खराब होण्याचे प्रमाण खूप कमी आहे. सोबतच ग्राहकांसाठी ATHER कंपनीने एक जबरदस्त ऑफर ठेवली आहे, जी इतर कुठल्याही स्पर्धक ईव्ही कंपनीने दिली नाही.
ATHER ने त्यांच्या ग्राहकांसाठी BuyBack स्कीम आणली आहे. ज्यात तुम्ही तुमची स्कूटर ३६ ते ४८ महिन्यात पुन्हा कंपनीला देऊन त्याची योग्य रक्कम परत घेऊ शकता. ३ वर्षांनी एखाद्या ग्राहकाला स्कूटर परत द्यायची असल्यास तो कंपनीला परत करू शकतो, त्याबदल्यात कंपनी एक्स शोरूम किंमतीच्या ६० टक्क्यांपर्यंतची रक्कम ग्राहकांना परत देते. जर ग्राहकाने ३६ महिन्यात स्कूटर परत केली तर त्याला ६० टक्के आणि ४८ महिन्यांनी स्कूटर परत केली तर त्याला ५० टक्क्यांपर्यंत रक्कम परत देण्याची हमी कंपनीकडून दिली जाते. ATHER कंपनीच्या यासारख्या ऑफर्समुळे त्यांच्या वाहन विक्रीत ६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीने मागील ३ महिन्यात ६५ हजार ५९५ यूनिट्सची विक्री केली आहे. एथरने आजवरचा सर्वाधिक तिमाही महसूल ९४०.७ कोटी इतका यावेळी नोंदवला आहे.