विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 13:35 IST2025-11-18T13:34:14+5:302025-11-18T13:35:12+5:30
या कारच्या एकूण २०,७९१ युनिट्सची विक्रमी झाली आहे...

विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
भारतीय ग्राहकांमध्ये सेडान कारची एक वेगळीच क्रेज दिसून येते. ऑक्टोबर २०२४ मध्ये या सेगमेंटमधील कारच्या विक्रीसंदर्भात बोलायचे झाल्यास, मारुती सुझुकी डिझायरने पुन्हा एकदा पहिला क्रमांक मिळवला आहे. या महिन्यात मारुती सुझुकी डिझायरच्या एकूण २०,७९१ युनिट्सची विक्रमी झाली आहे. महत्वाचे म्हणजे, या काळात डिझायरच्या विक्रीत तब्बल ६४ टक्के एवढी वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे.
डिझायरची एक्स-शोरूम किंमत ६.२१ लाख रुपयांपासून सुरू होते तर टॉप मॉडलची किंमत 9.31 लाख रुपयांपर्यंत जाते. मायलेजचा विचार करता, ही कार पेट्रोलवर २२ किमी तर सीएनजीवर सुमारे ३४ किमी पर्यंत मायलेज देते, यामुळे ही कार ग्राहकांसाठी एक आकर्षक पर्याय ठरतो.
विक्रीच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर ह्युंदाई ऑरा राहिली, हिच्या ५,८१५ युनिट्सची विक्री झाली असून २१ टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे होंडा अमेझ. हिच्या विक्रीत ५२ टक्क्यांच्या वाढ झाली असून, तिचे ३,६३० युनिट्स विकले गेले. फोक्सवॅगन व्हर्टस (२,४५३ युनिट्स) आणि स्कोडा स्लाव्हिया (१,६४८ युनिट्स) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर राहिल्या. तर टाटा टिगोर (१,१९६ युनिट्स) च्या विक्रीसह सहाव्या क्रमांकवर आहे.
याशिवाय, काही लोकप्रिय कारच्या विक्रीत घटही दिसून आली आहे. ह्युंदाई व्हर्नाच्या विक्रीत ३५ टक्क्यांची घट दिसून आली. यामुळे तिला केवळ ८२४ ग्राहक मिळाले. ती सातव्या क्रमांकवर राहिली. तर, होंडा सिटीच्या विक्रीत ४२ टक्क्यांची घसरण झाली. तिच्या केवळ ५७८ युनिट्सचीच विक्री होऊ शकली. ती आठव्या क्रमांकावर आहे. या व्यतिरिक्त नवव्या क्रमांकावर टोयोटा कॅमरी, हिच्या २७६ युनिट्सची विक्री झाली. हिच्या विक्रीत ५७ टक्क्यांची वार्षिक वाढ दिसून आली. तसेच मारुती सुझुकी सियाझ ही दहाव्या क्रमांकावर राहिली, जिला एकही ग्राहक मिळाला नसल्याचे समजते.