जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 15:11 IST2025-11-01T15:09:32+5:302025-11-01T15:11:26+5:30

October 2025 Auto Sales : सणासुदीच्या हंगामामुळे ऑटोमोबाइल क्षेत्राला मिळालेला 'बुस्टर डोस' ऑक्टोबर २०२५ च्या विक्री अहवालातून स्पष्ट झाला आहे.

October 2025 Auto Sales : GST cut, Dussehra and Diwali; October saw 'vehicle rain'! Not only Mahindra, Hyundai, Tata but also Skoda... | जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...

जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...

सणासुदीच्या उत्साहाने भरलेला ऑक्टोबर महिना देशातील ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी रेकॉर्डब्रेक ठरला आहे. जीएसटी कपातीमुळे वाहनांची विक्री एवढी वाढली, एवढी वाढली की लोकांनी दसरा, दिवाळीचा मुहूर्त गाठत सर्वच कंपन्यांना कधीही न पाहिलेले आकडे दाखविले आहेत. मारुतीच नाही तर टाटा, महिंद्रा, ह्युंदाईसह स्कोडानेही आजवर कधीही न पाहिलेला आकडा पार केला आहे. 

ऑक्टोबर महिन्याची वाहन विक्रीची आकडेवारी आली आहे. यानुसार मारुती १.९० लाख कार विकून एक नंबरवर आहे. टाटा मोटर्सने सलग दुसऱ्या महिन्यात किरकोळ विक्रीत महिंद्रा अँड महिंद्रा (एम अँड एम) आणि ह्युंदाई यांच्यावर आघाडी कायम ठेवली आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स (टीएमपीव्ही) ने ७४,७०५ युनिट्सची विक्री नोंदवली. एम अँड एमच्या ६६,८०० युनिट्स आणि ह्युंदाईच्या ६५,०४५ युनिट्स विकल्या गेल्या आहेत. 

किआ इंडियाची एकूण विक्री २९,५५६ युनिट्सवर, वार्षिक तुलनेत ३०% वाढ झाली आहे. टाटा मोटर्सची ईव्ही विक्री ७३% वाढून ९,२८६ युनिट्सवर पोहोचली आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरने ऑक्टोबरमध्ये एकूण विक्रीत ३९ टक्क्यांनी वाढ नोंदवली असून ती गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ३०,८४५ युनिट्सच्या तुलनेत ४२,८९२ युनिट्सवर पोहोचली आहे. 

निसान मोटर इंडियाने ऑक्टोबर २०२५ मध्ये ४५ टक्के मासिक विक्री वाढ नोंदवली. या ऑटोमेकरने महिन्यात एकूण ९,६७५ कार विकल्या. कंपनीची एकूण देशांतर्गत विक्री २,४०२ युनिट्स होती आणि निर्यात एकूण ७,२७३ युनिट्स आहेत. एमजी मोटरने 5,753 एवढ्या कार विकल्या आहेत. होंडाने 7,168 कार विकल्या आहेत. बीवायडी ५६०, 

स्कोडाने गाठला आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा...
स्कोडा ऑटो इंडियाने ऑक्टोबर २०२५ मध्ये ८,२५२ युनिट्सची विक्री नोंदवली, जी त्यांची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री आहे.  स्कोडाच्या कायलॅक या छोट्या एसयुव्हीला मोठी मागणी नोंदविण्यात आली. तर कुशकनेही चांगली विक्री नोंदविली. २०२५ च्या पहिल्या १० महिन्यांत, स्कोडा ऑटो इंडियाने ६१,६०७ वाहने विकली आहेत. स्कोडा आणि फोक्सवॅगनची एकत्रित विक्री ही 12,054 एवढी आहे. 

Web Title: October 2025 Auto Sales : GST cut, Dussehra and Diwali; October saw 'vehicle rain'! Not only Mahindra, Hyundai, Tata but also Skoda...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.