शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आता 'फ्लाइंग कार'ही आणतेय Maruti Suzuki, घराच्या छतावरून करता येणार ​'टेकऑफ' अन् 'लँडिंग'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 18:42 IST

Maruti Electric Air Copter: महत्वाचे म्हणजे, 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत हे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा मारुतीचा मानस आहे.

देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आता जमिनीवर चालणाऱ्या कार बरोबरच, हवेत उडणाऱ्या कार बनवण्याच्याही तयारीत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, मारुती सुझुकी आपली पॅरेंट कंपनी असलेल्या सुझुकीच्या सोबतीने इलेक्ट्रिक एअर कॉप्टर (Air Copters) बनवण्याच्या तयारीत आहे. कंपनी सुरुवातीला ही कार जपान आणि अमेरिकेसारख्या बाजारात लॉन्च करेल, यानंतर तीला भारतीय बाजारातही उतरवले जाऊ शकते.

TOI च्या वृत्तानुसार, मारुती सुझुकीने पॅरेंट कंपनी असलेल्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनसोबत यासाठी भागीदारी केली असून, या अंतर्गत हवेत उडणारे इलेक्ट्रिक कॉप्टर्स तयार केले जातील. हे एअर कॉप्टर्स ड्रोनपेक्षाही मोठे असतील, मात्र सामान्य हेलिकॉप्टरच्या तुलनेत लहान असतील. यात पायलटसह किमान 3 जणांसाठी बसण्याची व्यवस्था असेल, असे बोलले जात आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, कंपनी या एअर कॉप्टरला सर्वप्रथम जपान आणि अमेरिकेच्या बाजारात एअर टॅक्सी म्हणून लॉन्च करणार आहे. यानंतर त्या भारतीय बाजारातही आणण्याची योजना आहे. महत्वाचे म्हणजे, भातीय बाजारात केवळ लॉन्च करण्याचाच नव्हे, तर या एअर कॉप्टरची किंमत किमान ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर उत्पादन करण्यासंदर्भातही कंपनी विचार करत आहे.

केव्हा होणार लॉन्च? -यासंदर्भात बोलताना सुझुकी मोटरचे सहाय्यक व्यवस्थापक केंटो ओगुरा म्हणाले की, ही योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी विमान वाहतूक नियामकसोबत (DGCA) चर्चा सुरू आहे. स्कायड्राइव्ह नावाचे इलेक्ट्रिक एअर कॉप्टर जपानमधील 2025 ओसाका एक्सपोमध्ये लॉन्च करणे अपेक्षित आहे. महत्वाचे म्हणजे, 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत हे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा मारुतीचा मानस आहे.

हेलिकॉप्टरच्या तुलनेत कसे वेगळी असेल Maruti चे कॉप्टर? - उड्डाण करताना एअर कॉप्टरचे वजन 1.4 टन एवढे असेल. हे वजन पारंपरिक हेलीकॉप्टरच्या वजनापेक्षा जवळपास अर्धे असेल. तसेच माध्यमांतील वृत्तांनुसार, इलेक्ट्रिफिकेशनमुळे, या एअर कॉप्टरच्या कंपोनेंट्समध्ये बरीच घट झाली आहे. परिणामी, याचे मॅन्युफॅक्चरिंग आणि मेन्टनन्स कॉस्ट दोन्हीही कमी असतील.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobile Industryवाहन उद्योगauto expoऑटो एक्स्पो 2023JapanजपानIndiaभारतAmericaअमेरिकाcarकारAutomobileवाहनMarutiमारुती