भारतीय बाजारात या दिवशी लॉन्च होणार Nissan Tekton; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 17:26 IST2026-01-07T17:25:33+5:302026-01-07T17:26:16+5:30
ही कार थेट ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ग्रँड विटारा यांसारख्या कारना टक्कर देईल....

भारतीय बाजारात या दिवशी लॉन्च होणार Nissan Tekton; फीचर्सपासून किंमतीपर्यंत जाणून घ्या सविस्तर
निसान इंडिया आपली नवीन मिडसाईज एसयूव्ही (SUV) 'निसान टेक्टॉन' (Nissan Tekton) सादर करण्यासाठी सज्ज आहे. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी कंपनी जागतिक स्तरावर आपली ही कार सादर करणार आहे. रेनॉ डस्टरच्या नवीन जनरेशनच्या 'CMF-B' प्लॅटफॉर्मवर आधारित कंपनीची ही ५-सीटर एसयूव्ही जून २०२६ पर्यंत लाँच होऊ शकते. हीची किंमत अंदाजे ११ लाख ते १८ लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे. ही कार थेट ह्युंदाई क्रेटा आणि मारुती ग्रँड विटारा यांसारख्या कारना टक्कर देईल.
दिसेल 'बेबी पेट्रोल' लूक -
निसान टेक्टॉनचे डिझाईन निसानच्याच प्रसिद्ध फ्लॅगशिप SUV पेट्रोलच्या धरतीवर तयार करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. यामुळेच हिला 'बेबी पैट्रोल'ही म्हटले जात आहे. समोरच्या बाजूला मोठे ग्रिल, कनेक्टेड LED DRL आणि C-शेप LED हेडलँपमुळे ही कार अणखीनच आकर्षक दिसते. गाडीच्या बोनटवरील लाइन्स आणि 'Tekton' बॅजिंग तिला अधिक उठावदार बनवतात. बाजूच्या प्रोफाईलमध्ये रुंद व्हील आर्चेस, ड्युअल-टोन अलॉय व्हील्स बघायला मिळतात.
फीचर्स, सेफ्टी अन् इंजिन -
टेक्टॉनमध्ये वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, 360 डिग्री कॅमरा आणि अनेक ड्राइव्ह मोड मिळण्याची शक्यता आहे. सेफ्टीचा विचार करता, या कारमध्ये 6 एअरबॅग, ABS, ESC आणि लेव्हल-2 ADAS सारखे फीचर्स दिले जाऊ शकतात. इंजिनचा विचार करता, या कारला 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळू शकते. जे साधारणपणे 156 hp एवढी पॉवर जनरेट करेल. या नंतर या कारचे हायब्रीड व्हर्जनही येऊ शकते.