बाजारात नव्या E-Scooter चा धमाका; 200 Km ची रेंज, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स अन् बरंच काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 15:57 IST2023-10-27T15:55:44+5:302023-10-27T15:57:52+5:30
आतापर्यंत लोक इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजसंदर्भातत फारसे खूश नव्हते. कारण या स्कूटर्सची रेंज फारच कमी कमी असल्याने त्या वारंवार चार्ज कराव्या लागत होत्या.

बाजारात नव्या E-Scooter चा धमाका; 200 Km ची रेंज, क्रूझ कंट्रोल सारखे फीचर्स अन् बरंच काही
सध्या वेगाने वाढत असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या बाजारात आता आणखी एक नव्या इलेक्ट्रिक स्कूटरने धमाका केला आहे. आतापर्यंत लोक इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजसंदर्भातत फारसे खूश नव्हते. कारण या स्कूटर्सची रेंज फारच कमी कमी असल्याने त्या वारंवार चार्ज कराव्या लागत होत्या.
मात्र आता एक अशी स्कूटर बाजारात आली आहे, जी आपल्याला एखाद्या बजेट इलेक्ट्रिक कार एवढी रेंज देईल. ही स्कूटर आपल्याला एका वेळेस 200 किलोमीटरची रेंज देऊ शकेल. विशेष म्हणजे, कंपनी हिच्यासोबत एक एक्स्ट्रा बॅटरीही देत आहे. याचाच अर्थ आपल्याला डबल रेंज मिळेल आणि आपली डबल बचतही होईल.
हीचं नाव आहे, कोमाकी एसई डुअल. कोमाकीने आपली नवी स्कूटर बाजारात दोन नव्या कलर ऑप्शन्समध्ये लॉन्च केली आहे. ही आपल्याला चारकोल ग्रे आणि सेकरॅमेंटो ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल. या स्कूटरची आपल्याला 1.28 लाख रुपयांमध्ये (एक्स शोरूम किंमत) खरेदी करता येईल.
असे आहेत फीचर्स -
या स्कूटरमध्ये आपल्याला एलईडी फ्रंट विंकर, 50 अॅम्पिअर कंट्रोलर, पार्किंग असिस्ट, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट यांसारखी खास फीचर्स मिळतील. याशिवाय, नेव्हिगेशनसाठी टीएफटी स्क्रीन, साउंड सिस्टिम आणि रेडी-टू-राईड फीचरही मिळतील. याच बरोहर या स्कूटरला इको, स्पोर्ट आणि टर्बो, असे तीन गिअर मोड्स, ड्यूल डिस्क ब्रेक, कीफोब कीलेस एंट्री तसेच कंट्रोल आणि अँटी-स्किड टेक्नॉलॉजीही देण्यात आली आहे. तसेच, स्टोरेजसाठी 20 लिटरचा बूट स्पेसही देण्यात आला आहे.