MG Majestor: जबरदस्त इंटिरियर आणि स्पोर्ट लूक, एमजी मॅजेस्टर भारतात लॉन्च, फॉर्च्युनरला टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:13 IST2026-02-12T15:11:58+5:302026-02-12T15:13:05+5:30

एमजी मोटर इंडियाने आज (१२ फेब्रुवारी २०२६) आपली नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही एमजी मॅजेस्टर अधिकृतपणे लॉन्च केली आहे.

MG Majestor Launched Today: Design, features, powetrain, price and all you need to know | MG Majestor: जबरदस्त इंटिरियर आणि स्पोर्ट लूक, एमजी मॅजेस्टर भारतात लॉन्च, फॉर्च्युनरला टक्कर!

MG Majestor: जबरदस्त इंटिरियर आणि स्पोर्ट लूक, एमजी मॅजेस्टर भारतात लॉन्च, फॉर्च्युनरला टक्कर!

एमजी मोटर इंडियाने आज (१२ फेब्रुवारी २०२६) आपली नवीन फ्लॅगशिप एसयूव्ही एमजी मॅजेस्टर अधिकृतपणे लॉन्च केली आहे. ही एसयूव्ही कंपनीच्या 'ग्लोस्टर' पेक्षाही आकाराने मोठी असून डी+ सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आली. त्यामुळे भारतीय बाजारात फुल-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवणाऱ्या टोयोटा फॉर्च्युनरला आता मोठी टक्कर मिळणार आहे.

एमजी मॅजेस्टरमध्ये २.०-लिटर ट्विन-टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे, जे २१६ एचपी पॉवर आणि ४७८.५ एनएम टॉर्क निर्माण करते. ही कार रियर-व्हील ड्राइव्ह आणि फोर-व्हील ड्राइव्ह अशा दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. या कारमध्ये १२.३-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टचस्क्रीन सिस्टम आहे.सुरक्षेसाठी यात लेव्हल-२ ADAS सारखे फीचर्स मिळत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या कारमध्ये ग्राहकांना हीटिंग आणि मसाज फंक्शन देण्यात आले आहे.

एमजी मॅजेस्टर: किंमत 

देशभरातील एमजी डीलरशिपवर ४१,००० रुपयांच्या टोकन रक्कमेवर या कारची बुकिंग सुरू झाली आहे. अधिकृत किमतींची घोषणा एप्रिल २०२६ मध्ये केली जाईल, मात्र या गाडीची किंमत ४० लाख ते ४५ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याची शक्यता आहे. तर, मे २०२६ पासून ग्राहकांना या कारची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होईल.

एमजी मॅजेस्टर: मजबूत डिझाइन आणि स्पर्धा

मॅजेस्टरचे डिझाइन अत्यंत 'मस्क्युलर' असून समोरच्या बाजूला मॅट्रिक्स-स्टाईल ग्रिल आणि स्प्लिट हेडलॅम्प सेटअपमुळे तिला एक जबरदस्त लूक मिळतो. ही एसयूव्ही बाजारात आधीच असलेल्या टोयोटा फॉर्च्युनर लेजेंडर, स्कोडा कोडियाक, फोक्सवॅगन टायरॉन आणि निसान एक्स-ट्रेल यांसारख्या गाड्यांना थेट आव्हान देईल.

Web Title : MG मैजेस्टर लॉन्च: आलीशान इंटीरियर, स्पोर्टी लुक, फॉर्च्यूनर को टक्कर!

Web Summary : एमजी मोटर इंडिया ने मैजेस्टर एसयूवी लॉन्च की, जो फॉर्च्यूनर को टक्कर देगी। इसमें शक्तिशाली डीजल इंजन, आधुनिक सुविधाएं और आलीशान इंटीरियर हैं। बुकिंग शुरू; डिलीवरी मई 2026 से। अनुमानित कीमत: ₹40-45 लाख।

Web Title : MG Majester Launched: Luxurious Interior, Sporty Look, Fortuner Rival!

Web Summary : MG Motor India launched the Majester SUV, a Fortuner competitor, featuring a powerful diesel engine, advanced features, and luxurious interiors. Bookings are open; deliveries start May 2026. Expected price: ₹40-45 lakh.