MG Cyberster : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँच, किंमत Fortuner पेक्षा कमी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 03:14 PM2023-11-19T15:14:56+5:302023-11-19T15:15:52+5:30

या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारमध्ये 77kWh बॅटरी आहे, जी 536bhp च्या ड्युअल मोटर सेटअपसह येते आणि 725Nm टॉर्क जनरेट करते. 

mg cyberster price this electric car price check detail | MG Cyberster : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँच, किंमत Fortuner पेक्षा कमी!

MG Cyberster : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार लाँच, किंमत Fortuner पेक्षा कमी!

एमजी मोटर्सने (MG Motors) ग्राहकांसाठी आपली इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार (Electric SportsCar) लाँच केली आहे. दोन डोअर असलेल्या एमजी सायबरस्टरचे तीन व्हेरिएंट्स आहेत. ग्लॅमर एडिशन, स्टाइल एडिशन आणि पायोनियर एडिशन असे तीन व्हेरिएंट्स आहेत. या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारमध्ये 77kWh बॅटरी आहे, जी 536bhp च्या ड्युअल मोटर सेटअपसह येते आणि 725Nm टॉर्क जनरेट करते. 

टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाले तर ही कार फक्त 3.2 सेकंदात 100 चा स्पीड गाठते. RWD 501 व्हेरिएंटमध्ये 64kWh बॅटरी आहे, जी एका मोटरसह 310bhp पॉवर आणि 475Nm टॉर्क जनरेट करते. फुल चार्ज केल्यावर कार 501 किलोमीटरची रेंज देईल. RWD 580 व्हेरिएंटमध्ये 77 kWh ची मोठी बॅटरी आहे, जी सिंगल मोटर RWD सेटअपसह येते. या व्हेरिएंटची रेंज 4.9 सेकंदात 100 पर्यंत आहे.

AWD 520 व्हेरिएंटमध्ये 77 kWh बॅटरी देखील आहे, परंतु या मॉडेलमध्ये दोन मोटर्स आहेत. ज्या 536 bhp पॉवर आणि 725 Nm टॉर्क जनरेट करतात. एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही कार 502 किलोमीटरपर्यंत धावू शकते. वेगाबद्दल बोलायचे झाले तर ही कार 3.2 सेकंदात 100 किमी/ताशीचा वेग गाठेल. एमजी मोटर्सच्या या इलेक्ट्रिक कारची किंमत 3,19,900 चीनी युआन (अंदाजे 36 लाख 95 हजार 207 रुपये) आहे. या कारच्या अधिकृत लॉन्चपूर्वी या कारची किंमत 3,00,000 चीनी युआन पासून सुरू होईल, असे सांगितले जात होते.

Rushlane च्या अहवालानुसार, Cyberster Glamour Edition RWD 501 ची किंमत 319,900 चीनी युआन (अंदाजे 36,95,207 रुपये) आहे. Style Edition RWD 580 ची किंमत 339,800 चीनी युआन ((अंदाजे 39 लाख)) आणि  Pioneer Edition AWD 520 ची किंमत 315,800 चीनी युआन (अंदाजे 41.5 लाख) आहे. याचबरोबर, फॉर्च्युनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत भारतातील सायबरस्टरच्या टॉप व्हेरिएंटपेक्षा 10 लाख रुपये जास्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या कारची लांबी 4535mm, रुंदी 1913mm आणि व्हीलबेस 2690mm आहे.

Web Title: mg cyberster price this electric car price check detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.