शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

जगातील सर्वात महागडी कार; किंमत तब्बल 1100 कोटी रुपये; काय आहे खास, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 1:27 PM

यापूर्वी जगातील सर्वात महागड्या कारचा विक्रम फेरारी 250 जीटीओ नावाच्या कारवर होता.

world’s most expensive car: जगात सर्वात महागडी कार किती रुपयांची आहे? असा प्रश्न विचारल्यावर, तुम्ही काय सांगाल तर 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटी किंवा 30 कोटी रुपये...परंतु जगात एक अशी कार आहे, जी तब्बल 1100 कोटी रुपयांना विकली गेली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. एका लिलावात या कारची विक्री झाली, ज्यात या कारसाठी 1100 कोटी रुपये मिळाले.

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत, ती 1955 मध्ये बनलेली मर्सिडीज बेंज 300 एसएलआर(Mercedes Benz 300 SLR) कार आहे. ही कार जगातील आजपर्यंतची सर्वात महागडी कार असून जर्मनीमध्ये 1100 कोटी रुपयांना तिचा लिलाव करण्यात आला. Mercedes Benz 300 SLR ही स्पोर्ट्स कार असून ती अमेरिकन उद्योगपती डेव्हिड मॅकनील यांनी खरेदी केली आहे.

या कारला 'मोनालिसा ऑफ कार्स' म्हणतात. कंपनीने आतापर्यंत या मॉडेलच्या केवळ 2 कार तयार केल्या आहेत. यात 3.0 लिटर पेट्रोल इंजिन असून ते 180 किमी वेगाने धावू शकते. या कारने त्यावेळी 12 पैकी 9 कार रेस जिंकून रेसिंग जगतावर वर्चस्व गाजवले होते.

यापूर्वी दुसऱ्या कारचा सर्वात मोठा लिलावया कारच्या आधी फेरारी 250 GTO ने जगातील सर्वात महागडी कार होण्याचा विक्रम केला होता. त्या कारची 542 कोटी रुपयांना विक्री झाली होती. मर्सिडीज-बेंझ 300 एसएलआरचा लिलाव गेल्या वर्षी 5 मे रोजी जर्मनीतील स्टटगार्ट येथील मर्सिडीज-बेंझ संग्रहालयात झाला. या लिलावाने फेरारी 250 जीटीओचा लिलाव रेकॉर्ड मोडला.

कार कधी बनवली होती?मीडिया रिपोर्ट्सनुसार, मर्सिडीज-बेंझ 300 एसएलआरचे फक्त दोन मॉडेल्स कंपनीने 1950 मध्ये बनवले होते. यानंतर 1955 मध्ये मर्सिडीजने ही रेसिंग कार बनवणे बंद केले. मर्सिडीजच्या या दोन हाय टॉप व्हेरियंट कारमध्ये तीन लिटर इंजिन आहे, ज्याची क्षमता 302 PS आहे. कारचे इंजिन खूप मजबूत आहे. त्या काळातील कारमध्ये ही सर्वात वेगवान कार होती. ही रेसिंग कार रेसिंग ट्रॅकवर लॉन्च करण्यात आली होती. 1954 मध्ये या कारने 12 पैकी 9 शर्यती जिंकून लोकांचे लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :Mercedes Benzमर्सिडीज बेन्झAutomobileवाहनcarकारAutomobile Industryवाहन उद्योग