जगातील सर्वात महागडी कार; किंमत तब्बल 1100 कोटी रुपये; काय आहे खास, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 01:27 PM2024-03-10T13:27:43+5:302024-03-10T13:28:06+5:30

यापूर्वी जगातील सर्वात महागड्या कारचा विक्रम फेरारी 250 जीटीओ नावाच्या कारवर होता.

Mercedes Benz 300 SLR The most expensive car in the world; cost is around 1100 crore rupees; What's special, know... | जगातील सर्वात महागडी कार; किंमत तब्बल 1100 कोटी रुपये; काय आहे खास, जाणून घ्या...

जगातील सर्वात महागडी कार; किंमत तब्बल 1100 कोटी रुपये; काय आहे खास, जाणून घ्या...

world’s most expensive car: जगात सर्वात महागडी कार किती रुपयांची आहे? असा प्रश्न विचारल्यावर, तुम्ही काय सांगाल तर 1 कोटी, 2 कोटी, 10 कोटी किंवा 30 कोटी रुपये...परंतु जगात एक अशी कार आहे, जी तब्बल 1100 कोटी रुपयांना विकली गेली आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. एका लिलावात या कारची विक्री झाली, ज्यात या कारसाठी 1100 कोटी रुपये मिळाले.

आम्ही ज्या कारबद्दल बोलत आहोत, ती 1955 मध्ये बनलेली मर्सिडीज बेंज 300 एसएलआर(Mercedes Benz 300 SLR) कार आहे. ही कार जगातील आजपर्यंतची सर्वात महागडी कार असून जर्मनीमध्ये 1100 कोटी रुपयांना तिचा लिलाव करण्यात आला. Mercedes Benz 300 SLR ही स्पोर्ट्स कार असून ती अमेरिकन उद्योगपती डेव्हिड मॅकनील यांनी खरेदी केली आहे.

या कारला 'मोनालिसा ऑफ कार्स' म्हणतात. कंपनीने आतापर्यंत या मॉडेलच्या केवळ 2 कार तयार केल्या आहेत. यात 3.0 लिटर पेट्रोल इंजिन असून ते 180 किमी वेगाने धावू शकते. या कारने त्यावेळी 12 पैकी 9 कार रेस जिंकून रेसिंग जगतावर वर्चस्व गाजवले होते.

यापूर्वी दुसऱ्या कारचा सर्वात मोठा लिलाव
या कारच्या आधी फेरारी 250 GTO ने जगातील सर्वात महागडी कार होण्याचा विक्रम केला होता. त्या कारची 542 कोटी रुपयांना विक्री झाली होती. मर्सिडीज-बेंझ 300 एसएलआरचा लिलाव गेल्या वर्षी 5 मे रोजी जर्मनीतील स्टटगार्ट येथील मर्सिडीज-बेंझ संग्रहालयात झाला. या लिलावाने फेरारी 250 जीटीओचा लिलाव रेकॉर्ड मोडला.

कार कधी बनवली होती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मर्सिडीज-बेंझ 300 एसएलआरचे फक्त दोन मॉडेल्स कंपनीने 1950 मध्ये बनवले होते. यानंतर 1955 मध्ये मर्सिडीजने ही रेसिंग कार बनवणे बंद केले. मर्सिडीजच्या या दोन हाय टॉप व्हेरियंट कारमध्ये तीन लिटर इंजिन आहे, ज्याची क्षमता 302 PS आहे. कारचे इंजिन खूप मजबूत आहे. त्या काळातील कारमध्ये ही सर्वात वेगवान कार होती. ही रेसिंग कार रेसिंग ट्रॅकवर लॉन्च करण्यात आली होती. 1954 मध्ये या कारने 12 पैकी 9 शर्यती जिंकून लोकांचे लक्ष वेधून घेतले.

Web Title: Mercedes Benz 300 SLR The most expensive car in the world; cost is around 1100 crore rupees; What's special, know...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.