मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 13:05 IST2025-10-03T13:04:40+5:302025-10-03T13:05:22+5:30
या महिन्यात टाटाच्या कार विक्रीत तब्बल 47% एवढी वार्षिक वाढ झाली आहे. नुकत्याच जालेल्या GST सुधारणेमुळे कारांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या....

मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
भारतीय ऑटोमोबाईल बाजारात गेला सप्टेंबर महिना टाटा मोटर्ससाठी ऐतिहासिक ठरला. या महिन्यात कंपनीने तब्बल 60,907 गाड्यांची विक्री नोंदवत थेट दिसऱ्या स्थानावर उडी घेतली. या महिन्यात टाटानेमहिंद्रा (56,233 युनिट्स) आणि ह्युंदाई (51,547 युनिट्स) सारख्या दिग्गज कंपन्यांनाही पछाडले आहे.
GST 2.0चा फायदा,47 टक्के वाढ -
या महिन्यात टाटाच्या कार विक्रीत तब्बल 47% एवढी वार्षिक वाढ झाली आहे. नुकत्याच जालेल्या GST सुधारणेमुळे कारांच्या किंमती मोठ्या प्रमाणावर कमी झाल्या. याशिवाय ग्राहकांचाही कार खरेदीकडील ओढा वाढला.
नेक्सन ठरली नंबर 1 -
टाटाच्या या यशामागे मुख्य वाटा नेक्सन SUVचा आहे. या एका महिन्यात, नेक्सच्या तब्बल 22,500 हून अधिक युनिट्सची विक्री झाली. पेट्रोल, डिझेल, CNG व EV अशा सर्व पर्यायांमुळे नेक्सन ग्राहकांची पहिली पसंती ठरली. इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये हॅरियर EVलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे, तर हॅरियर-सफारी जोडीनेही सर्वोच्च विक्री नोंदवली.
टाटाच्या EV विक्रीने 9,191 युनिट्सच्या विक्रीचा आकडा गाठत 96% एवढी वार्षिक उसळी घेतली. तर Q2 FY26 मध्ये CNG मॉडेल्सची विक्री 17,800 युनिट्सवर पोहोचली, जी तब्बल 105% वाढ आहे.
ह्युंडई- महिंद्राला मागे टाकले
आजवर मारुती अव्वल, तर ह्युंडई क्रमांक-2 वर कायम होती. मात्र आता सप्टेंबर महिन्यात ह्युंडई चौथ्या तर महिंद्राची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली.
तज्ज्ञांच्या मते, सणासुदीतील मागणी, EV+CNG सेगमेंटमधील वाढ आणि पुरवठा साखळीतील सुधारणा, यांमुळे टाटा मोटर्स आपली पकड अधिक मजबूत करेल. महत्वाचे म्हणजे, सप्टेंबर महिना भारतीय ऑटो इंडस्ट्रीसाठी टर्निंग पॉईंट ठरला असून टाटा मोटर्सने आता, आपण केवळ स्पर्धकच नव्हे तर टॉप-3मध्यील एक आघाडीचा ब्रँड असल्याचे दाखवून दिले आहे.