शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

Maruti Suzuki ने घेतला निस्सान, कियाचा धसका; स्वस्त एसयुव्ही आणण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 11:22 AM

Maruti Suzuki : या कारचे कुप किंवा मिनी क्रॉस ओव्हरसारखे डिझाईन असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयुव्हींनी वेगाने पकड मिळविली आहे. यामुळे कंपनी या सेगमेंटमध्ये आणखी एक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे.

भारताची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) भारतीय बाजारात लवकरच एक कॉम्पॅक्ट स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल म्हणजेच एसयुव्ही लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही भारतातील सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार असून  ती पॉप्युलर हॅचबॅक Baleno वर आधारित असणार आहे. या एसयुव्हीचे कोडनेम ‘YTB’ ठेवण्यात येणार आहे. 

Maruti Suzuki च्या या कारचे कुप किंवा मिनी क्रॉस ओव्हरसारखे डिझाईन असण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयुव्हींनी वेगाने पकड मिळविली आहे. यामुळे कंपनी या सेगमेंटमध्ये आणखी एक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. निस्सान इंडियाने नुकतीच ४.९९ लाख एवढ्या कमी किंमतीत Nissan Magnite लाँच केल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे फोर्ड या सेगमेंटचा पायोनिअर असला तरीही किया आणि ह्युंदाई या सेगमेंटमध्ये पाय पसरू लागले आहेत. ह्युंदाईकडे व्हेन्यू आणि कियाकडे सोनेट या अद्ययावत कार आहेत. या कारनी भारतीय बाजारात जलवा करण्यास सुरुवात केल्याने मारुतीलाही आता नवीन कारची गरज भासू लागली आहे. 

नवीन कार अंतर्गत रचनेत बलेनोसारखीच असणार आहे. यामध्ये जास्त बदल केला जाणार नाही. मात्र, डिझाईन आणि बाहेरील रचना ही काहीशी एसयुव्ही सारखी असणार आहे. यामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे. ऑटो कंपन्या त्यांच्या ताफ्यातील कार वाढविण्यासाठी हा खेळ करतात. यामध्ये एखाद्या पॉप्युलर प्लॅटफॉर्मवर नवीन कार बनविली जाते. यामुळे बाजारात लवकर पकड बनविता येते. YTB ही कंपनीची दुसरी कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार आहे. Maruti Suzuki Vitara Brezza ही कंपनीची पहिली एसयुव्ही आहे. ही कार २०१६ मध्ये लाँच करण्यात आली होती. मारुतीला या सेगमेंटमध्ये विस्तार करायचा आहे. 

मारुती, टाटाला जोरदार टक्कर; स्विफ्टपेक्षाही स्वस्त, 4.99 लाखांत कॉम्पॅक्ट SUV लाँच 

निस्सान इंडियाने त्यांच्या नव्या निस्सान मॅग्नाईटच्या किमती जाहीर केल्या आहेत. Nissan Magnite ची विशेष किंमत ही 4,99,000 लाखांत ठेवण्यात आली आहे. ही किंमत ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत असणार आहे. भारतीय बाजारपेठेसाठी कंपनीने आखलेल्या निसान नेक्स्ट या धोरणांतर्गत बनवण्यात आलेली ही पहिली गाडी असून आर्थिक वर्ष २०२०-२१च्या दुसऱ्या सहामाहीत ती प्रत्यक्ष रस्त्यांवर धावणार आहे. या नव्या छोट्या एसयुव्हीमध्ये लाइट्सएबर-स्टाइल टर्न इंडिकेटर्ससह अत्यंत शैलीदार असे हेडलँप्स, एल-शेप एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स (डीआरएल), डॉमिनेटिंग फ्रंट ग्रिल देण्यात आले आहेत. वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, पड्ल लँप्स, बियंट/मूड लायटिंग, जेबीएलचे प्रीमिअम स्पीकर्स देण्यात आले आहेत.  ६०-४० स्प्लिट फोल्टेबर रिअर सीटही देण्यात आली आहे. यामुळे लगेज स्पेस वाढविता येते. लगेज स्पेसची क्षमता ३३६ लीटर एवढी आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीNissanनिस्सानHyundaiह्युंदाईKia Motars Carsकिया मोटर्स