नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 10:49 IST2025-09-03T10:47:41+5:302025-09-03T10:49:01+5:30

Maruti Escudo थेट Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या पॉप्युलर SUVs ना टक्कर देऊ शकते....

Maruti Suzuki new SUV Escudo is being launched on 3 september 2025 with modern features, know about how much it will cost | नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?

नवी कार घेण्याचा विचार करताय...? आज मॉडर्न फीचर्ससह लॉन्च होतेय मारुतीची नवी SUV Escudo, जाणून घ्या, किती असेल किंमत?

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki आज (3 सप्टेंबर) ला आपली नवी SUV Maruti Escudo लॉन्च करत आहे. मारुतीची ही SUV ब्रेझाच्या तुलनेत मोठी आणि ग्रँड व्हिटाराच्या तुलनेत स्वस्त असेल.  ही कार कंपनी आपल्या Arena डीलरशिप नेटवर्कच्या माध्यमाने विकेल. या कारच्या डिझाइनसंदर्भात बोलायचे झाल्यास, Escudo अत्यंत मॉडर्न आणि स्टायलिश आहे. हिच्यासोबत बूमरँग-स्टाइल 3D LED टेललँप, शार्क फिन अँटीना, इंटीग्रेटेड स्पॉइलर आणि मोठा टेलगेट देण्यात आला आहे. साइजच्या तुलनेत ही Brezza पेक्षा थोडी मोठी आणि साधारणपणे Grand Vitara एवढीच असेल. यामुळे या कारमध्ये अधिक केबिन स्पेस आणि बूट कॅपेसिटी मिळेल.

असं असेल इंजिन आणि पॉवरट्रेन? -
Maruti Escudo मध्ये Grand Vitara प्रमाणेच इंजिन ऑप्शन्स देण्यात आले आहे. यात 1.5 लिटर पेट्रोल इंजिन माइल्ड हाइब्रिड टेक्नॉलॉजीसह येईल. याशिवाय टोयोटाचे 1.5 लिटर TNGA स्ट्रॉन्ग हायब्रिड इंजिनही दिले जाऊ शकते. महत्वाचे म्हणजे, कंपनी या कारचे सीएनजी व्हर्जनही लॉन्च करण्याच्याव विचारात आहे. यामुळे ग्राहकांना पेट्रोल, हायब्रिड आणि CNG – तीनही पर्याय मिळतील.

इंटीरियर आणि टेक फीचर्स -
एस्कुडोचे इंटीरियर अ‍ॅडव्हान्स्ड आणि प्रीमियम ठेवण्यात आले आहे. यात ९ इंचाचे मोठे टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असेल, जे वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेला सपोर्ट ही करेल. याशिवाय या एसयूव्हीमध्ये ६ एअरबॅग्ज, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस फोन चार्जर आणि मल्टीपल ड्राइव्ह मोड्स सारखी वैशिष्ट्येही असू शकतात. तसेच, फ्लॅट-बॉटम स्टीअरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि प्रीमियम अपहोल्स्ट्री सारखी वैशिष्ट्यांचाही या कारमध्ये समावेश असणे अपेक्षित आहे.

या कारसोबत असेल स्पर्धा -
Maruti Escudo थेट Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या पॉप्युलर SUVs ना टक्कर देऊ शकते. हिच्या किंमतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मात्र, अंदाजे हिची सुरुवातीची किंमत साधारणपणे 10 लाख रुपयांपासून सुरू होईल. अर्थात ही Grand Vitara च्या तुलनेत किफायतशीर असेल. तसेच, Brezza च्या तुलनेत अधिक फीचर-लोडेड असेल. 

Web Title: Maruti Suzuki new SUV Escudo is being launched on 3 september 2025 with modern features, know about how much it will cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.