मारुती लॉन्च करतेय सर्वाधिक मायलेज देणारी नवी SUV, करा खरेदीची तयारी; जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 06:47 PM2022-09-25T18:47:23+5:302022-09-25T18:51:10+5:30

ग्रँड विटारा लॉन्च झाल्यानंतर, हिची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, वोक्सवॅगन ताइगुन, स्कोडा कुशाक आणि टोयोटा हाय रायडरसोबत असेल.

maruti grand vitara launch tomorrow price expectations best mileage in segment know about the specialty | मारुती लॉन्च करतेय सर्वाधिक मायलेज देणारी नवी SUV, करा खरेदीची तयारी; जाणून घ्या किंमत

मारुती लॉन्च करतेय सर्वाधिक मायलेज देणारी नवी SUV, करा खरेदीची तयारी; जाणून घ्या किंमत

Next

मारुती सुझुकी सोमवारी भारतात अपली नवी मिड-साईज एसयूव्ही ग्रँड विटारा लॉन्च करत आहे. या एसयुव्हीमध्ये माइल्ड हाइब्रिड आणि स्ट्राँग हायब्रिड पॉवरट्रेन असे दोन ऑप्शन उपलब्ध असतील. ही कार टोयोटा आणि सुझुकी यांनी एकत्रितपणे कर्नाटकातील टोयोटाच्या फॅक्ट्रीमध्ये तयार केली आहे. 11,000 रुपयांच्या टोकनवर हिची बुकिंग केली जाऊ शकते. ऑक्टोबरपासून या गाडीचे बुकिंग सुरू होणे अपेक्षित आहे. महत्वाचे म्हणजे ही कार आपल्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक म्हणजेच, 27.97 किमी प्रति लिटर एवढे मायलेज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.

या कार सोबत असेल स्पर्धा -
ग्रँड विटारा लॉन्च झाल्यानंतर, हिची स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किआ सेल्टोस, वोक्सवॅगन ताइगुन, स्कोडा कुशाक आणि टोयोटा हाय रायडरसोबत असेल. मारुती ग्रँड विटाराची किंमत 10 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.  तर टॉप-स्पेक स्ट्रांग हायब्रिड व्हेरिअंटची किंमत 20 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.

ग्रँड विटारा फीचर्स -
मारुती सुझुकी ग्रँड विटारामध्ये पॅनोरमिक सनरूफ, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, 360-डिग्री पार्किंग कॅमेरा, अॅम्बिएंट लायटिंग, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, किलेस एन्ट्री, रिअर एसी व्हेंट, इंजीनला स्टार्ट/स्टॉप करण्यासाठी एक पुश बटन, यूएसबी पोर्ट, 9 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम, अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले सपोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

ग्रँड विटारा इंजिन -
मारूती सुझुकी आणि टोयोटा या दोघांनी एकत्रितपणे हायरायडर आणि ग्रँड विटारा तयार केली आहे. हायरायडरप्रमाणेच ग्रँड विटाराला माइल्ड-हायब्रिड पॉवरट्रेन देण्यात आले आहे. हे 1462cc K15 इंजिन असून 6,000 RPM वर जवळपास 100 bhp पॉवर आणि 4400 RPM वर 135 Nm टॉर्क जनरेट करते. यात माइल्ड हायब्रिड सिस्टिम आहे आणि हिला 5-स्पीड मॅन्युअल अथवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्ट ऑटोमॅटिकसह जोडण्यात आले आहे. हे पॉवरट्रेनही आतापर्यंतचे AWD ऑप्शन असलेले एकमेव इंजिन आहे.

Web Title: maruti grand vitara launch tomorrow price expectations best mileage in segment know about the specialty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.