Maruti Ertiga Cruise लाँच, स्पोर्टी लुक आणि जबरदस्त मायलेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2024 17:10 IST2024-02-19T17:09:39+5:302024-02-19T17:10:01+5:30
Maruti Ertiga Cruise : मारुतीने नवीन एर्टिगा दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केली आहे.

Maruti Ertiga Cruise लाँच, स्पोर्टी लुक आणि जबरदस्त मायलेज
Maruti Ertiga Cruise नवी दिल्ली : मारुतीने आपली नवीन एर्टिगा क्रूझ (Maruti Ertiga Cruise) हायब्रीड कार लाँच केली आहे. मारुतीने या एमपीव्हीमध्ये अनेक मोठे बदल केले आहेत, ज्यामध्ये कंपनीने एक्सटीरिअर आणि इंटीरिअरसोबत एक पॉवरफुल बॅटरी दिली आहे. मारुतीने नवीन एर्टिगा दोन कलर ऑप्शनमध्ये सादर केली आहे. यामध्ये पेअर व्हाइट प्लस कूल ब्लॅक ड्युअल टोन आणि इंटेन्सिफाइड कूल ब्लॅक कलर आहे.
मारुती एर्टिगा क्रूझची ही हायब्रिड आवृत्ती आहे, जी पेट्रोल आणि सीएनजी कारपेक्षा फ्यूल एफिशियंसीमध्ये स्वस्त आहे, कारण मारुतीने तिला पूर्वीपेक्षा अधिक पॉवरफुल बॅटरी दिली आहे. तसेच, तुम्हाला मारुती एर्टिगा क्रूझ हायब्रीड व्हर्जनमध्ये स्पोर्टी लुक मिळेल, ज्यामुळे या एमपीव्ही चालवण्याचा अनुभव चांगला मिळेल.
फीचर्स
नवीन एर्टिगाच्या इंटीरिअरमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये या एमपीव्हीमध्ये 17.78 cm Smartplay Pro टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Arkamys साउंड सिस्टम, अँड्राईड ऑटो आणि Apple कार प्ले सिस्टम, क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ॲम्बियंट लाइटिंग, पुश बटण स्टार्ट, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि 360 व्ह्यू डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. याचबरोबर, कारच्या एक्सटीरियरबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन एर्टिगामध्ये स्पोर्टी फ्रंट बंपर, साइड अंडर स्पॉयलर, साइड बॉडी डिकल, रिअर अप्पर स्पॉयलर, स्पोर्टी रिअर बंपर विथ अंडर स्पॉयलर, 16 इंच अलॉय व्हेईकल, एलईडी हेडलॅम्प, एलईडी टेल लॅम्प आणि फ्रंट फॉग लॅम्प दिले आहे.
इंजिन
नवीन एर्टिगामध्ये माइल्ड-हायब्रिड टेक्नॉलॉजिसह 1.5 लिटर K15B पेट्रोल इंजिन आहे, जे 103ps पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, या एमपीव्हीमध्ये 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे. नवीन एर्टिगा प्रति लीटर 20 किमी मायलेज देते.
किंमत
मारुती एर्टिगा सध्या इंडोनेशियामध्ये लाँच करण्यात आली आहे. ज्याची किंमत IDR 288 मिलियन आहे. जी भारतीय चलनानुसार एक्स-शोरूम 15.3 लाख रुपये आहे. तर ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत भारतीय रुपयांमध्ये 16 लाख रुपये आहे. दरम्यान, या वर्षाच्या अखेरपर्यंत एर्टिगा क्रूझ भारतात लाँच होण्याची शक्यता आहे.