महिंद्राच्या EV कार्सवर ग्राहक तुटून पडले; फक्त एका वर्षात 'इतक्या' हजार कार्सची विक्री...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 16:21 IST2026-04-03T16:17:58+5:302026-04-03T16:21:59+5:30

Mahindra EV: भारतात इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे.

Mahindra EV: Customers are blown away by Mahindra's EV cars; 50 thousand cars sold in just one year | महिंद्राच्या EV कार्सवर ग्राहक तुटून पडले; फक्त एका वर्षात 'इतक्या' हजार कार्सची विक्री...

महिंद्राच्या EV कार्सवर ग्राहक तुटून पडले; फक्त एका वर्षात 'इतक्या' हजार कार्सची विक्री...

Mahindra EV: दिग्गज भारतीय कार उत्पादक कंपनी Mahindra & Mahindra ने इलेक्ट्रिक वाहन बाजारात मोठा टप्पा गाठला आहे. कंपनीने फक्त एका वर्षात आपल्या ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ कार्सच्या 50 हजार युनिट्सची विक्री पूर्ण केली आहे. या यशानंतर कंपनीने उत्पादनही वाढवले असून, आता वेटिंग पिरियड कमी होण्याची शक्यता आहे.

कोणत्या कार्सचा समावेश?

महिंद्राच्या ‘बॉर्न इलेक्ट्रिक’ पोर्टफोलिओमध्ये खालील इलेक्ट्रिक कार्सचा समावेश आहे-

BE6
XEV 9E
XEV 9S

या सर्व कार्स कंपनीच्या INGLO इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित आहेत.

विक्रीचा प्रवास कसा राहिला?

महिंद्राच्याइलेक्ट्रिक कार्सच्या विक्रीचा प्रवास वेगाने वाढताना दिसत आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत विक्री 30,000 युनिट्स होती, तर फेब्रुवारी 2026 पर्यंत 41,000 आणि पुढील फक्त 6 आढवट्यात 50,000 युनिट्स विक्रीचा टप्पा ओलांडला. यावरून इलेक्ट्रिक कार्सची मागणी वेगाने वाढत असल्याचे दिसून येते. 

विशेष म्हणजे, 2025 मध्ये कंपनी दरमहा सरासरी 5,000 इलेक्ट्रिक कार्स तयार करत होती. मार्च 2026 पासून उत्पादन वाढवून 8,000 युनिट्स प्रति महिना करण्यात आले आहे. यामुळे ज्यांनी आधीच कार बुक केली आहे, त्यांना आता लवकर डिलिव्हरी मिळण्याची अपेक्षा आहे.

किंमत किती आहे?

मॉडेलसुरुवातीची किंमत
BE6₹18.90 लाख
XEV 9S₹19.95 लाख
XEV 9E₹21.90 लाख

बॅटरी आणि रेंज

या सर्व कार्समध्ये 59 kWh किंवा 79 kWh बॅटरी पॅक असून, या 650 किमीपेक्षा जास्तची रेंज देतात.  कंपनीच्या माहितीनुसार, ग्राहकांमध्ये मोठ्या बॅटरी पॅकची मागणी जास्त आहे. एकूण प्री-ऑर्डरपैकी 73% प्री-ऑर्डर मोठ्या बॅटरी पॅकसाठी आहेत.

Web Title : महिंद्रा की इलेक्ट्रिक कारों की भारी मांग: एक साल में 50,000 यूनिट बिकीं

Web Summary : महिंद्रा एंड महिंद्रा की 'बॉर्न इलेक्ट्रिक' कारों की बिक्री एक साल में 50,000 यूनिट तक पहुंची। वेटिंग पीरियड कम करने के लिए उत्पादन बढ़ाकर 8,000 यूनिट प्रति माह किया जा रहा है। BE6, XEV 9S और XEV 9E मॉडल 650 किमी से अधिक की रेंज देते हैं। शुरुआती कीमत ₹18.90 लाख है।

Web Title : Mahindra EV Cars See Huge Demand: 50,000 Units Sold in a Year

Web Summary : Mahindra & Mahindra's 'Born Electric' cars hit 50,000 unit sales in one year. Production is ramping up to 8,000 units monthly to cut wait times. The BE6, XEV 9S, and XEV 9E models offer ranges exceeding 650km. The starting price is ₹18.90 Lakhs.