शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Scorpio Classic: महिंद्राच्या 'या' SUVची जबरदस्त विक्री; जुना फोटो शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले- 'Old is Gold'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 13:43 IST

Mahindra Best Selling SUV: सप्टेंबर महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात कारच्या विक्रीमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे.

Mahindra Best Selling SUV: सप्टेंबर महिन्यातील कार विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. सप्टेंबर महिन्यात कारच्या विक्रीमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. इतर कंपन्यांबरोबरच महिंद्रासाठीही सप्टेंबर महिना चांगला गेला. महिंद्रा सप्टेंबर 2022 मध्ये सर्वात मोठी SUV विक्री करणारी कार कंपनी ठरली आहे. 

Mahindra Scorpio-N आणि Mahindra XUV700 सारख्या वाहनांची ग्राहकांची जोरदार मागणी आहे. यातही कंपनीच्या स्कॉर्पिओ क्लासिकचे सर्वाधिक बुकिंग झाले आहे. महिंद्राने गेल्या महिन्यातच आपल्या प्रसिद्ध स्कॉर्पिओ कारचे एक नवीन व्हर्जन(Mahindra Scorpio Classic ) लॉन्च केले आहे. 

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा देखील नवीन स्कॉर्पिओ क्लासिकचे बुकिंग पाहून चकीत झाले. त्यांनी ट्विटरवर एक जुना फोटो शेअर केला आणि जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. ट्विटमध्ये त्यांनी 2002 मधील पहिल्या स्कॉर्पिओच्या लॉन्चचा फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी लिहिले, "सप्टेंबर चांगला होता, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या महिन्यात सर्वात जास्त बुकिंग स्कॉर्पिओ क्लासिकसाठी होते. 2002 मध्ये पहिल्या स्कॉर्पिओच्या लॉन्चच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जुने तेच सोने आहे..." 

स्कॉर्पिओ क्लासिकची पॉवरस्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2 लिटर सेकंड जनरेशन mHawk डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे 132 PS ची कमाल पॉवर आणि 300 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. महिंद्राचे म्हणणे आहे की, फ्यूल इकॉनमीमध्येही 15% वाढ झाली आहे. यात 6-स्पीड ट्रान्समिशन उपलब्ध आहे. महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकची किंमत रु.11.99 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्राAutomobileवाहन