शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मेड इन इंडिया Kia Sonet आली; जाणून घ्या फिचर्स आणि बरेच काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2020 14:15 IST

भारतात कियाची ही तिसरी कार असून याआधी कंपनीने Kia Seltos आणि Kia Carnival बाजारात आणलेली आहे. यापैकी सेल्टॉसने मंदीतही मोठी विक्री नोंदविली होती. 

नवी दिल्ली : Kia Motors ची मेड इन इंडिया कॉम्पॅक्ट SUV Kia Sonet भारतासह जगभरातील बाजारपेठांसाठी लाँच करण्यात आली आहे. ही कार यंदाच्या सर्वाधक चर्चेत असलेल्या कारपैकी एक आहे. भारतात कियाची ही तिसरी कार असून याआधी कंपनीने Kia Seltos आणि Kia Carnival बाजारात आणलेली आहे. यापैकी सेल्टॉसने मंदीतही मोठी विक्री नोंदविली होती. 

Kia Sonet ला खासकरून भारतासाठी बनविण्यात आले आहे. ही कार आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधील प्रकल्पामध्ये बनविण्यात आली आहे. इथूनच जगभरात ही कार पाठविली जाणार आहे. कंपनीने या कारला कनेक्टेड कार म्हणून समोर आणले आहे. ही कार iMT आणि व्हायरस प्रोटेक्शनसारख्या हाय़टेक फिचरने युक्त आहे. कियाने या कॉम्पॅक्ट SUV Kia Sonet मध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम दिली आहे. याशिवाय Bose ची 7 स्पीकर सिस्टीम, इलेक्ट्रीक सनरूफ, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स देण्यात आले आहेत. या कारला स्मार्टवॉचने देखील कनेक्ट करता येणार आहे. 

कियाच्या या कारमध्ये तीन इंजिन ऑप्शन मिळणार आहेत. शिवाय यामध्ये 5 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड मॅन्युअल, 6 स्पीड AT आणि 6 स्पीड iMT चा पर्याय मिळणार आहे. किया सोनेट GT Line मध्ये 1.0 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लीटर टर्बो डिझेल इंजिन मिळणार आहे. 

कियामध्ये सेफ्टीफिचर्सही देण्यात आले आहेत. 6 एअरबॅग, ABS, EBD, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS), ऑटो हेडलाइट, ब्रेक असिस्ट (BA), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल असिस्ट कंट्रोल (HAC) सारखे फिचर आहेत. कियाची ही कार मारुतीच्या ब्रेझा, इकोस्पोर्ट, नेक्सॉन, व्हेन्यूला टक्कर देणार आहे. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Video: केरळच्या प्रसिद्ध मुन्नार टेकडीवर भूस्खलन; 5 मृत; 80 जण ढिगाऱ्याखाली

नाशिक हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची निघृण हत्या; दोन लहान मुलांचाही समावेश

नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र

Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले

आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सAutomobileवाहन