इराणयुद्धामुळे उद्योगांना, हॉटेल व्यावसायिकांना कमर्शिअल गॅस सिंलिंडर पुरवठा रोखण्यात आला आहे. याचा फटका ऑटो इंडस्ट्रीला देखील बसण्यास सुरुवात झाली असून औरंगाबाद एमआयडीसीतील बजाज ऑटोला सुटे भाग पुरविणाऱ्या कंपनीमधील काही असेम्ब्ली लाईन बंद ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे बजाज ऑटोच्या उत्पादनाला या टंचाईचा फटका बसणार आहे.
इंडस्ट्रीला पुरविण्यात येणारे गॅस सिलिंडर हे वेगळे असतात. पांढऱ्या-चंदेरी रंगाचे हे मोठे सिलिंडर असतात. त्यांचा पुरवठा करणारे व्हेंडर असतात. या पुरवठादारांना यापुढे एलपीजी सिलिंडर न देण्याचे आदेश केंद्र सरकारकडूनच आले आहेत. यामुळे त्यांनीही पुढील पुरवठा थांबविला आहे. यामुळे या कंपन्यांना त्यांच्याकडे असलेल्या स्टॉक सिलिंडरचे नियोजन करावे लागत आहे.
बजाज ऑटोच्या ऑटो रिक्षासाठी पार्ट पुरविणाऱ्या कंपनीचे प्लांट मॅनेजर महेश बावकर यांनी ही माहिती दिली आहे. बजाज ऑटो पावडर कोटिंग आणि अन्य प्रोसेससाठी एलपीजी गॅस लागतो. सध्या आमच्याकडे उपलब्ध असलेल्या गॅसवर उत्पादन सुरु आहे. पुरवठादार असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलिअम सोबत चर्चा सुरु आहे. परंतू, कधीपर्यंत गॅस मिळेल याबाबत त्यांच्याकडून काहीच माहिती मिळालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
Web Summary : Iran war halts LPG supply, impacting auto industry. Bajaj Auto faces component shortage, potentially halting production. Gas cylinder supply stopped by government order. Companies manage existing stock.
Web Summary : ईरान युद्ध से एलपीजी आपूर्ति बाधित, ऑटो उद्योग प्रभावित। बजाज ऑटो को उपकरणों की कमी, उत्पादन रुकने की आशंका। सरकार के आदेश से गैस सिलेंडर की आपूर्ति बंद। कंपनियां मौजूदा स्टॉक का प्रबंधन कर रहीं हैं।