GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:29 IST2025-09-01T15:28:58+5:302025-09-01T15:29:49+5:30

दिल्लीमध्ये Maruti Ertiga ची एक्स-शोरूम किंमत 8.97 लाख रुपयांपासून ते 13.41 लाख रुपयांपर्यंत जाते.

Know about If GST is reduced, how much cheaper can the best-selling Maruti Ertiga become How much rupees can be saved | GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या

GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या

जर आपण या सणासुदीच्या काळात, एखादी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही आपल्यासाठी एक चांगली संधी ठरू शकते. कारण सरकार अनेक गोष्टींवरील जीएसटी कमी करण्याची योजना आखत आहे. या छोट्या कारचाही समावेश आहे.

आता कारवर लागणारा 28 टक्के एवढा जीएसटी कमी करून, 18 टक्क्यांपर्यंत आणला जाऊ शकतो. अर्थात, असे झाल्यास, ग्राहकांना थेट 10 टक्यांचा फायदा मिळेल. तर उदाहरण म्हणून जाणून घेऊयात, मोस्ट सेलिंग मारुती एर्टिगा जीएसटी कमी झाल्यानंतर किती स्वस्त होऊ शकते?

किती कमी होऊ शकते मारुती एर्टिगाची किंमत? -
दिल्लीमध्ये Maruti Ertiga ची एक्स-शोरूम किंमत 8.97 लाख रुपयांपासून ते 13.41 लाख रुपयांपर्यंत जाते. जर या एमपीव्हीवरील 10 टक्के GST कमी झाला, तर ही कार आपल्याला 90 हजार रुपयांपर्यंत स्वस्त मिळू शकते.

जाणून घ्या कारचे फीचर्स? - 
मारुती एर्टिगामध्ये एक 9-इंचांचे SmartPlay Pro टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. जी वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay ला सपोर्ट करते. याच बरोबर, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल आणि रिअर एसी वेंट्स सारखे कूलिंग फीचर्स देखील देण्यात आले आहे.
 
मारुती एर्टिगामध्ये क्रूझ कंट्रोल, कीलेस एंट्री आणि पुश-बटण स्टार्ट/स्टॉप देण्यात आले आहेत. एवढेच नाही तर आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या कारमध्ये स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी आणि अॅलेक्सा सपोर्टदेखील देण्या आला आहे. 

कारचे पावरट्रेन? -
मारुती एर्टिगामध्ये एक 1.5-लीटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन, जे 101.65 bhp ची पॉवर आणि 136.8 Nm चा टार्क जनरेट करते. हे इंजिन पेट्रोल आणि CNG, अशा दोन्ही व्हिरिअंटमध्ये उपलब्ध आहे. CNG व्हेरिअंटमध्ये ये इंजन 88 PS एवढी पॉवर आणि 121.5 Nm एवढा टॉर्क देते. 

Web Title: Know about If GST is reduced, how much cheaper can the best-selling Maruti Ertiga become How much rupees can be saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.