अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:38 IST2025-08-12T17:37:48+5:302025-08-12T17:38:56+5:30
तर जाणून घेऊया या एसयूव्ही संदर्भात सविस्तर...

अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
भारतीय ग्राहकांमध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री सातत्याने वाढत आहे. मात्र असे असतानाही, जुलै २०२५ मध्ये, किआच्या EV६ आणि EV९ या दोन प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्हींना बाजारात एकही ग्राहक मिळाला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, भारतात लाँच झाल्यापासून EV६ ही एक स्टायलिश आणि हाय-परफॉर्मन्स EV म्हणून ओळखली जाते. महत्वाचे म्हणजे, एक वर्षापूर्वी म्हणजेच जुलै २०२४ मध्ये २२ लोकांनी EV६ खरेदी केली होती. याशिवाय, EV९ही कंपनीची एक प्रमुख इलेक्ट्रिक एसयूव्ही (फ्लॅगशिप इलेक्ट्रिक एसयूव्ही) आहे. तर जाणून घेऊया या एसयूव्ही संदर्भात सविस्तर...
रेंज ६०० किमी हून अधिक -
किआ EV६ सोबत ७७.४kWh बॅटरी पॅक मिळतो, जो एका चार्जमध्ये सुमारे ६६३ किमीची (ARAI) रेंज देतो. महत्वाचे म्हणजे, ही ईव्ही ० ते १०० kmph चा स्पीड, केवळ ५.२ सेकंदांत धारण करते. फीचर्स संदर्भात बोलायचे झाल्यास, कारमध्ये पॅनोरॅमिक कर्व्हड डिस्प्ले, ड्युअल १२.३-इंच स्क्रीन, १४-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम, व्हेंटिलेटेड सीट्स आणि ADAS लेव्हल-२ सारख्या सेफ्टी टेक्नोलॉजीचा समावेश आहे. बाजारात Kia EV६ ची एक्स-शोरूम किंमत सुमारे ६५ लाख रुपयांपासून सुरू होते.
किआ EV९ ची किंमत किती? -
किआ EV९ संदर्भात बोलायचे झाल्यास, ही एक ७-सीटर इलेक्ट्रिक SUV असून हिला ९९.८kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार सुमारे ५४१ किमीची रेंज देते. या कारचे डिझाईन फ्यूचरिस्टिक असून, कारला फ्लश डोअर हँडल, एलईडी लाईट सिग्नेचर आणि प्रीमियम केबिन देण्यात आले आहे. फीचर्समध्ये ३-रो सीटिंग, ३-रो सीटिंग, ड्युअल टचस्क्रीन सेटअप, पॅनोरॅमिक सनरूफ, ३६०-डिग्री कॅमेरा आणि अॅडव्हॉन्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टमचा समावेश आहे. किआ EV९ ची एक्स-शोरूम किंमत साधारणपणे १.३० कोटी रुपये एवढी आहे.