Kia: किआची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, एका चार्जवर ४९० किमी धावणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:35 IST2025-07-15T15:35:19+5:302025-07-15T15:35:57+5:30

Kia Carens Clavis EV Launched: किआने भारतीय बाजारात त्यांची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक कार कारेन्स क्लॅविस ईव्ही लॉन्च केली.

Kia Carens Clavis EV launched in India at 17.99 lakh | Kia: किआची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, एका चार्जवर ४९० किमी धावणार!

Kia: किआची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च, एका चार्जवर ४९० किमी धावणार!

किआने भारतीय बाजारात त्यांची पहिली मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक कारकारेन्स क्लॅविस ईव्ही लाँच केली. ही इलेक्ट्रिक कार एका चार्जवर ४९० किमीपर्यंत अंतर कापले, असा दावा कंपनीकडून केला जात आहे. भारतात या कारची सुरुवातीची एक्स- शोरूम किंमत १७ लाख ९९ हजार आहे. तर, या कारचे टॉप मॉडेल २४. ४९ हजारांत खरेदी केले जाऊ शकते.

या कारमध्ये ग्राहकांना ४२ किलोवॅट/प्रतितास आणि ५१ किलोवॅट/प्रतितास अशा दोन बॅटरीचा पर्याय मिळतो. कंपनीचा दावा आहे की, ४२ किलोवॅट क्षमतेची बॅटरी एका चार्जवर ४०४ किमी अंतर गाठेल. तर, ५१.१  किलोवॅट क्षमतेची बॅटरी एका चार्जवर ४९० किमी अंतर चालेल. ही इलेक्ट्रिक कार फक्त ८.४ सेकंदात ० ते १०० किमी प्रतितास वेगाने धावू शकते.

किआ कॅरेन्स क्लॅविस ईव्हीमध्ये फ्रंट ग्रिल, एरोडायनामिक अलॉय व्हील्स आणि एलईडी लाईट बारसह काही बदल करण्यात आले आहेत. तर इंटीरियरमध्ये ड्युअल १२.३-इंच स्क्रीन, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग, पॅनोरॅमिक सनरूफ आणि बोस साउंड सिस्टम यासारखी फीचर्स देण्यात आली आहेत. 

या कारमध्ये ६-एअरबॅग्ज, एडीएएस लेव्हल-२, ईएससी, टीपीएमएस, ३६०-डिग्री कॅमेरा आणि आय-पेडल तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. या इलेक्ट्रीक कार थेट ह्युंदाई क्रेटा ईव्ही, टाटा कर्व्ह ईव्ही आणि एमजी झेडएस ईव्ही यांच्याची स्पर्धा असेल.

Web Title: Kia Carens Clavis EV launched in India at 17.99 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.