भारतीय रस्त्यांवर दिसली नवीन इलेक्ट्रिक SUV! महिंद्राची थार तर नक्कीच नाही, मग कोण आणतेय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 09:16 IST2026-02-25T09:15:00+5:302026-02-25T09:16:08+5:30

JSW-Chery iCar V23 India Launch: नवीन इलेक्ट्रिक SUV iCar V23 भारतात टेस्टिंग दरम्यान दिसली. ५१० किमी रेंज आणि दमदार फीचर्ससह ही कार लवकरच लाँच होणार आहे. वाचा सविस्तर माहिती.

JSW-Chery iCar V23 India Launch: A new electric SUV has been spotted on Indian roads! It's definitely not Mahindra's, so who's bringing it... | भारतीय रस्त्यांवर दिसली नवीन इलेक्ट्रिक SUV! महिंद्राची थार तर नक्कीच नाही, मग कोण आणतेय...

भारतीय रस्त्यांवर दिसली नवीन इलेक्ट्रिक SUV! महिंद्राची थार तर नक्कीच नाही, मग कोण आणतेय...

भारतीय इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये आता एका नवीन आणि शक्तिशाली स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. JSW मोटर्स आणि चीनची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी चेरी यांच्या भागीदारीतून तयार झालेली iCar V23 ही इलेक्ट्रिक SUV नुकतीच भारतात टेस्टिंग दरम्यान दिसली आहे. या कारचा रेट्रो-मॉडर्न लूक आणि दमदार रेंज ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.

iCar V23 चा डिझाइन पूर्णपणे 'बॉक्सी' आणि मस्कुलर आहे. गोलाकार हेडलाईट्स आणि जीप रँग्लरप्रमाणे असणारा फ्रंट बंपर या कारला एक वेगळी ओळख देतात. २१० मिमीचे ग्राउंड क्लीयरन्स आणि २,७३५ मिमीचा मोठा व्हीलबेस यामुळे ही SUV ऑफ-रोडिंगसाठी देखील सक्षम आहे. मर्सिडीज जी-क्लासप्रमाणे याच्या मागील बाजूस एक स्टाइलिश स्टोरेज बॉक्स देण्यात आला आहे.

प्रीमियम इंटीरियर आणि स्मार्ट फीचर्स
कारच्या आत १५.४ इंचाची मोठी टचस्क्रीन देण्यात आली आहे, जी ॲपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. स्पोर्टी लुकसाठी ब्लॅक इंटीरियरमध्ये पिवळ्या रंगाचे फिनिश देण्यात आले आहे. तसेच वेंटिलेटेड आणि पॉवर-ॲडजस्टेबल सीट्स, ७-स्पीकर ऑडिओ सिस्टम आणि PM2.5 एअर फिल्टर यांसारखे फीचर्स प्रवाशांचा प्रवास सुखकर करतात.

दमदार परफॉर्मन्स आणि रेंज
ही इलेक्ट्रिक SUV दोन पर्यायांमध्ये उपलब्ध असू शकते:
१. RWD व्हर्जन: १३६hp पॉवर आणि ४०१ किमी रेंज.
२. AWD व्हर्जन: २११hp पॉवर आणि २९२Nm टॉर्क. यामध्ये ८१.७६kWh चा बॅटरी पॅक असून तो ५१० किमी पर्यंतची रेंज देऊ शकते.

सुरक्षेला प्राधान्य
सुरक्षेसाठी या कारमध्ये ADAS, ५४०-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि चारही चाकांना डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत.

Web Title : भारतीय सड़कों पर दिखी नई इलेक्ट्रिक SUV: महिंद्रा थार नहीं!

Web Summary : जेएसडब्ल्यू मोटर्स और चेरी की iCar V23 इलेक्ट्रिक SUV, रेट्रो-मॉडर्न डिजाइन के साथ, हाल ही में भारत में टेस्टिंग के दौरान देखी गई। इसमें प्रभावशाली रेंज, एक बड़े टचस्क्रीन के साथ प्रीमियम इंटीरियर, और ADAS और 540-डिग्री कैमरे जैसी मजबूत सुरक्षा सुविधाएँ हैं।

Web Title : New Electric SUV Spotted on Indian Roads: Not Mahindra Thar!

Web Summary : JSW Motors and Chery's iCar V23 electric SUV, with a retro-modern design, was recently spotted testing in India. It boasts impressive range, a premium interior with a large touchscreen, and robust safety features like ADAS and a 540-degree camera.