दुसऱ्या नंबरसाठी रस्सीखेच! ह्युंदाईने जूनमध्ये अखेर टाटाला मागे टाकले; 62351 कार विकल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 07:35 PM2022-07-01T19:35:11+5:302022-07-01T19:35:26+5:30

ह्युंदाईने नुकतीच व्हेन्यू ही सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार लाँच केली आहे. या कारने दोन वर्षांपूर्वी ह्युंदाईला मोठी विक्री करून दिली होती.

Hyundai Regains No 2 In June 2022 Sales; overtook Tata in June; 62351 cars were sold | दुसऱ्या नंबरसाठी रस्सीखेच! ह्युंदाईने जूनमध्ये अखेर टाटाला मागे टाकले; 62351 कार विकल्या

दुसऱ्या नंबरसाठी रस्सीखेच! ह्युंदाईने जूनमध्ये अखेर टाटाला मागे टाकले; 62351 कार विकल्या

googlenewsNext

गेल्या काही काळापासून दुसऱ्या क्रमांकासाठी ह्युंदाई आणि टाटा मोटर्समध्ये तीव्र स्पर्धा रंगली आहे. काही महिन्यांपूर्वी टाटानेह्युंदाईला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावला होता. परंतू जूनमध्ये ह्युंदाईने टाटाला धोबीपछाड दिला आहे. 

ह्युंदाईने वार्षिक विक्रीमध्ये २१ टक्के वाढ नोंदविली आहे. तर मे महिन्याच्या तुलनेत १६ टक्के मासिक वाढ झाली आहे. याहून अधिक दिलासा देणारी बाब म्हणजे टाटाला विक्रीमध्ये मागे टाकले आहे. टाटा दुसऱ्या क्रमांकावरून तिसऱ्या नंबरवर आली आहे. 

ह्युंदाईने जून २०२२ मध्ये एकूण 62,351 कार विकल्या आहेत. यामध्ये भारतात 49,001 कार विकल्या आहेत. तर 13,350 युनिट एक्स्पोर्ट केले आहेत. गेल्या महिन्यात ह्युंदाईने २१ टक्के एवढी वार्षिक वाढ नोंदविली होती. जून २०२१ मध्ये कंपनीने 40 496 युनिट विकल्या होत्या. मे २०२२ मध्ये  कंपनीने 42,293 कार विकल्या होत्या. 

ह्युंदाईने नुकतीच व्हेन्यू ही सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही कार लाँच केली आहे. या कारने दोन वर्षांपूर्वी ह्युंदाईला मोठी विक्री करून दिली होती. यामुळे ही कार येत्या काळात पुन्हा ह्युंदाईला चांगले दिवस दाखवेल आणि टाटाच्या नेक्सॉनला टक्कर देण्याची शक्यता आहे. 

Web Title: Hyundai Regains No 2 In June 2022 Sales; overtook Tata in June; 62351 cars were sold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.