Hyundai India: भारतामध्ये बजेट इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत असली, तरी हाय-एंड लग्झरी इलेक्ट्रिक SUV ची विक्री मर्यादित आहे. या पार्श्वभूमीवर ह्युंडाई इंडिया आपल्या Ioniq 5 इलेक्ट्रिक SUV वर मोठ्या प्रमाणात सवलत देत आहे.
7 लाखांचा डिस्काउंट
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ह्युंडाई इंडिया नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्या अनेक मॉडेल्सवर आकर्षक ऑफर्स देत आहे. यामध्ये Grand i10 Nios, Exter, i20, Venue, Alcazar आणि इलेक्ट्रिक SUV Ioniq 5 चा समावेश आहे.
Ioniq 5 (2024 मॉडेल) वर तब्बल ₹7.05 लाखांपर्यंतची सवलत, तर 2025 मॉडेल वर ₹2.05 लाखांपर्यंतचा फायदा मिळू शकतो. ही SUV सध्या एकाच व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून, तिची एक्स-शोरूम किंमत ₹46.05 लाख आहे. दरम्यान, सवलतीचे प्रमाण शहर, डीलर आणि स्टॉकनुसार वेगवेगळे असू शकते.
रेंज आणि बॅटरी परफॉर्मन्स
Hyundai Ioniq 5 मध्ये 72.6 kWh ची लिथियम-आयन बॅटरी दिली आहे, जी ARAI प्रमाणित 631 किमी रेंज देते. या SUV मध्ये असलेली इलेक्ट्रिक मोटर 217bhp पॉवर आणि 350Nm टॉर्क निर्माण करते. ही SUV रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) सिस्टीमसह येते आणि 800V सुपरफास्ट चार्जिंग सपोर्ट देते. या तंत्रज्ञानामुळे बॅटरी 10% ते 80% फक्त 18 मिनिटांत चार्ज करता येते.
इंटीरियर आणि फीचर्स
Ioniq 5 चं इंटीरियर मिनिमल पण आधुनिक डिझाइनसह येतो. त्यात फ्लॅट फ्लोर, मूवेबल सेंटर कन्सोल, आणि एडजस्टेबल सीट्स आहेत. सीट्स आणि फॅब्रिक रीसायकल्ड प्लास्टिक आणि इको-फ्रेंडली लेदर पासून बनवले गेले आहेत.
इतर फिचर्स...
यात दोन 12.3-इंचाच्या स्क्रीन (एक इन्फोटेनमेंटसाठी आणि दुसरी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी), ADAS (Advanced Driver Assistance System), ऑगमेंटेड रिअॅलिटी हेड-अप डिस्प्ले, व्हेइकल-टू-लोड (V2L) फिचर आणि इतर अनेक प्रीमियम फिचर्सचा समावेश आहे.
Web Summary : Hyundai India offers up to ₹7 lakh discount on Ioniq 5 (2024 model) to clear stock. The electric SUV boasts a 631km range and fast charging.
Web Summary : हुंडई इंडिया आयोनिक 5 (2024 मॉडल) पर ₹7 लाख तक की छूट दे रही है। यह इलेक्ट्रिक एसयूवी 631 किमी की रेंज और फास्ट चार्जिंग के साथ आती है।