दिवाळीनिमित्त Hyundai Aura वर १.१४ लाख रुपयांची बचत; जाणून घ्या नवीन किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:12 IST2025-10-07T13:12:05+5:302025-10-07T13:12:46+5:30
GST Reforms 2025: जीएसटी कपातीनंतर कारच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

दिवाळीनिमित्त Hyundai Aura वर १.१४ लाख रुपयांची बचत; जाणून घ्या नवीन किंमत...
Hyundai Aura : नवीन कार घेण्याचा विचार करताय? तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. जीएसटी 2.0 लागू झाल्यानंतर अनेक कार कंपन्यांनी त्यांच्या गाड्यांच्या किंमतींमध्ये मोठी कपात केली आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या तीन सेडान गाड्या ह्युंदाई ऑरा, मारुती डिजायर आणि होंडा अमेझ यांच्या किंमतीदेखील मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.
Hyundai Aura ५.९८ लाख रुपयांपासून...
भारतीय सेडान सेगमेंटमध्ये मारुती डिझायरनंतर ह्युंदाई ऑरा ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. गेल्या काही महिन्यांत या मॉडेलच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. जीएसटी 2.0 नंतर ऑराच्या किंमतीत ₹76,316 इतकी घट झाली आहे. त्यामुळे आता या कारची सुरुवातीची किंमत ₹5.98 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे. कंपनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ₹38,000 पर्यंतचे अतिरिक्त बेनिफिटदेखील देत आहे. म्हणजेच, एकूण ₹1.14 लाख पर्यंतचा फायदा मिळू शकतो.
व्हेरिएंट | जुनी किंमत | नवीन किंमत | घट |
---|---|---|---|
E व्हेरिएंट | ₹6.54 लाख | ₹5.98 लाख | ₹55,780 |
SX+ व्हेरिएंट | ₹8.94 लाख | ₹8.18 लाख | ₹76,316 |
Maruty Dzire
भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेडानपैकी एक असलेल्या मारुती डिझायरच्या किंमतीतही मोठी घट करण्यात आली आहे. आता या कारची सुरुवातीची किंमत ₹6.25 लाख (एक्स-शोरूम) झाली आहे. या मॉडेलला GNCAP सेफ्टी रेटिंग, उत्कृष्ट फिचर्स आणि चांगले मायलेज असल्यामुळे आता ती आणखी “व्हॅल्यू फॉर मनी” पर्याय ठरते.
Honda Amaze
होंडा अमेझच्या दोन्ही जनरेशनवर किंमत कपात करण्यात आली आहे. सेकंड जनरेशन अमेझवर ₹72,800 पर्यंत सवलत तर, थर्ड जनरेशन अमेझवर ₹95,500 पर्यंत सवलत मिळते. त्यामुळेच सेडान सेगमेंट आणखी स्पर्धात्मक झाला आहे.