दमदार फीचर्ससह भारतात लाँच झाली Hyundai Alcazar SUV; पाहा किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 06:22 PM2021-06-18T18:22:15+5:302021-06-18T18:29:49+5:30

Hyndai SUV : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कंपनीनं लाँच केली आपली 7 सीटर एसयूव्ही. ग्राहकांना मिळणार पेट्रोल आणि डिझेलचा ऑप्शन.

Hyundai Alcazar launch in India expected price features specifications mileage other details | दमदार फीचर्ससह भारतात लाँच झाली Hyundai Alcazar SUV; पाहा किती आहे किंमत

दमदार फीचर्ससह भारतात लाँच झाली Hyundai Alcazar SUV; पाहा किती आहे किंमत

Next
ठळक मुद्देप्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कंपनीनं लाँच केली आपली 7 सीटर एसयूव्ही.ग्राहकांना मिळणार पेट्रोल आणि डिझेलचा ऑप्शन.

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर Hyundai Alcazar ही सात सीटर एसयूव्ही अखेर भारतात लाँच झाली आहे. Prestige, Platinum आणि Signature या तीन ट्रिम्समध्ये ही कार बाजारात उपलब्ध असणार आहे. तसंच यासोबत कंपनीनं ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेल व्हेरिअंटचेदेखील ऑप्शन दिले आहेत. कंपनीनं या महिन्याच्या सुरूवातीलाच कारचं बुकिंग घेण्यास सुरू केलं होतं. तसंच ग्राहकांना २५ हजार रूपयांत ही कार बुक करण्याची संधीही होती. या कारची स्पर्धा Hector Plus, XUV500 आणि Tata Safari सारख्या कार्ससोबत आहे. 

Hyundai Alcazar SUV मध्ये 2.0 लिटरचं 4 सिलिंडर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर, 4 सिलिंडर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन देण्यात आलं आहे. पेट्रोल इंजिन 115bhp आणि 250Nm चा टॉर्क जेनरेट करतं. तर दुसरीकडे डिझेल इंजिन 159bhp आणि 192Nm टॉर्क जेनरेट करतो. दोन्हीही इंजिन 6 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससोबत येतात. तसंच दोन्ही इंजिनसोबत Optional (O) व्हेरिअंटदेखील येतं. त्यामध्ये 6-स्पीड टॉर्क कनव्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आलं आहे.


अधिक मायलेज
आपल्या सेगमेंटमध्ये अधिक मायलेज देणारी ही कार आहे. पेट्रोल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये 14.5kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमध्ये 14.2kmpl मायलेज देते. याशिवाय डिझेल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशन 20.4kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रांसमिशनमध्ये 18.1kmpl मिळत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. या कारची किंमत 16.30 लाखांपासून 19.99 लाखांपर्यंत जाते.

कसे आहेत फीचर्स?
Hyundai Alcazar ही कार सहा आणि सात सीटर ऑप्शनमध्ये मिळते. याशिवाय यात मिळणाऱ्या फीचर्सची यादीही मोठी आहे. यामध्ये 10.25 इंचाचा इन्फोटेन्मेंट सिस्टम देण्यात आले आहे. तसंच तो अँड्राईड प्ले किंवा अॅपल कार प्ले सोबत कनेक्ट केला जाऊ शकतो. याशिवाय या कारमध्ये पॅनोरमिक सनरुफ, लेन चेंज कॅमेरा आणि 360 डिग्री कॅमेरा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त ब्लूलिंक कनेक्टिव्हीटीसह वॉईस रेकग्नायझेशन, 7 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रूमेंटल क्लस्टर, ६ एअरबॅग्स, व्हेईकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट,हिल स्टार्ट, एबीएस आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD) सारखे फीचर्स देण्यात येत आहेत.

Web Title: Hyundai Alcazar launch in India expected price features specifications mileage other details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app