शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
2
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
5
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
6
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
7
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
8
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
9
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
10
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
11
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
12
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
13
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
14
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
15
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
16
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
17
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
18
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

कारचे ब्रेक फेल झाले तर काय कराल? चागंल्या-चांगल्या लोकांना माहीत नाही याचं उत्तर, असा वाचेल आपला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 7:52 AM

How to stop a vehicle if brakes fail : ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळताच लोक गडबडतात, घाबरतात. मात्र, घाबरून जाऊ नका. कारण घाबरल्याने परिस्थिती आणखी बिकट बनते. यामुळे शांत राहून खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. 

विचार करा, जर तुम्ही 90 कि.मी. ताशी वेगाने कार चालवत असाल आणि अचानक तुमच्या कारचे ब्रेक फेल झाले. अशी परिस्थिती कुणावरही आणि केव्हाही येऊ शकते. खरे तर, कारचे ब्रेक फेल झाल्यानंतर काय करायला हवे, हे फार कमी कार चालकांना माहीत असते. तर आज आम्ही आपल्याला सागणार आहोत, की चालत्या कारचे ब्रेक फेल झाल्यास आपण कुठल्या स्टेप्स वापरून आपला जीव वाचवू शकता...

सर्वात पहिले घाबरून जाऊ नका -ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळताच लोक गडबडतात, घाबरतात. मात्र, घाबरून जाऊ नका. कारण घाबरल्याने परिस्थिती आणखी बिकट बनते. यामुळे शांत राहून खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. 

पार्किंग लाइट्स ऑन करा - पार्किंग लाइट्स (Hazards) हे आणीबाणीच्या काळासाठीच दिलेले असतात. गाडीचे पार्किंग लाइट्स ऑन झाल्याने, आपल्या कारमध्ये काही समस्या निर्माण झाल्याचे मागून  येणाऱ्या लोकांच्या लक्षात येते.

गियर करतील मोठं काम -जेव्हा आपल्या गाडीचे ब्रेक फेल होईल तेव्हा गियर बदला. गाडीचे गियर कमी केल्यानंतर, तिचा वेगही कमी होतो. हाच प्रयोग आपल्याला ऑटोमॅटिक कारमध्येही करायचा आहे. अधिकांश ऑटोमॅटिक कार्समध्ये मॅनुअल सेटिंग्स देण्यात आलेली असते. या ठिकाणी आपल्याला एक-एक करून गियर कमी करायचा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच कार पाचव्या गियरवर असेल, तर आपल्याला आधी चौथ्या गियरवर आणायची आहे. कारण गियर थेट पहिल्या किंवा दुसऱ्यावर नेल्यास इंजिनमध्ये समस्या निर्माण होऊ शकते. 

कार रस्त्याच्या कडेने चालवा - ब्रेक फेल झाल्यानंतर, कार रस्त्याच्या मधोमध न चालवता, ती लगेच रस्त्याच्या कडेला घ्या. यामुळे अपघात होण्याची धोका कमी होईल. 

इमरजन्सी हँडब्रेकचा वापर - अशा स्थितीत आपल्याला हँड ब्रेकचा वापर करायला हवा. मात्र, या ब्रेकचा वापर हळूवारपणे करायचा आहे, हे लक्षात असू द्या. वेगात असलेल्या कारला एकदमच हँडब्रेक लावला, तर कार स्किट होऊ शकते आणि आपल्याला दुखापत होऊ शकते.

टॅग्स :carकारAutomobileवाहन