होंडा Activa ची मोठी कामगिरी; महाराष्ट्रात ओलांडला 50 लाख विक्रीचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:16 IST2026-03-06T19:15:35+5:302026-03-06T19:16:06+5:30

या विक्रीसह अॅक्टिव्हाने राज्यातील दुचाकी बाजारपेठेत आपले मजबूत स्थान पुन्हा अधोरेखित केले आहे.

Honda Activa's big achievement; crosses 50 lakh sales mark in Maharashtra | होंडा Activa ची मोठी कामगिरी; महाराष्ट्रात ओलांडला 50 लाख विक्रीचा टप्पा

होंडा Activa ची मोठी कामगिरी; महाराष्ट्रात ओलांडला 50 लाख विक्रीचा टप्पा

देशातील अग्रगण्य दुचाकी उत्पादक कंपनी होंडा मोटर्स आणि स्कूटर इंडियाने महाराष्ट्रात आपल्या लोकप्रिय स्कूटर Honda Activa च्या एकूण 50 लाख विक्रीचा मोठा टप्पा गाठला आहे. भारतातील सर्वात मोठ्या दुचाकी बाजारपेठांपैकी एक असलेल्या महाराष्ट्रात हा टप्पा गाठणे कंपनीसाठी मोठी कामगिरी मानली जात आहे. कंपनीने ही ऐतिहासिक कामगिरी 25 वर्षांच्या कालावधीत साध्य केली असून, ग्राहकांचा सातत्यपूर्ण विश्वास आणि बाजारातील मजबूत उपस्थिती याचे हे प्रतीक मानले जात आहे.

प्रमुख शहरांमधून मोठी मागणी

महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर आणि नवी मुंबई या प्रमुख शहरांमधील सातत्यपूर्ण मागणीमुळे अॅक्टिव्हाच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. या शहरांमध्ये दैनंदिन प्रवासासाठी दुचाकी हे अत्यंत सोयीस्कर आणि विश्वासार्ह साधन मानले जाते. त्यामुळे अॅक्टिव्हाने राज्यातील शहरी आणि निमशहरी भागात मोबिलिटी ट्रेंड घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

700 पेक्षा अधिक विक्री व सेवा केंद्रांचे मजबूत जाळे

महाराष्ट्रभर 700 पेक्षा अधिक विक्री आणि सेवा केंद्रांचे मजबूत नेटवर्क अॅक्टिव्हाच्या यशामागील महत्त्वाचा घटक मानला जात आहे. या विस्तृत जाळ्यामुळे ग्राहकांना सुलभ खरेदी अनुभव, विक्रीनंतरची विश्वासार्ह सेवा आणि दीर्घकालीन विश्वास मिळतो.

कंपनीची प्रतिक्रिया

या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना HMSI चे संचालक (विक्री आणि विपणन) मुत्सुओ उसुई म्हणाले, “महाराष्ट्रात अॅक्टिव्हाच्या 50 लाख विक्रीचा टप्पा गाठणे म्हणजे गेल्या 25 वर्षांत ग्राहकांनी आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. महाराष्ट्र ही अत्यंत गतिमान बाजारपेठ असून, दैनंदिन प्रवासासाठी विश्वासार्ह मोबिलिटीचे महत्त्व या यशातून अधोरेखित होते.”

अॅक्टिव्हाची लोकप्रियता कायम

अॅक्टिव्हाची मजबूत रिसेल व्हॅल्यू, विस्तृत सेवा नेटवर्क आणि इंधन कार्यक्षमतेमुळे ती ग्राहकांमध्ये लोकप्रिय राहिली आहे. महाराष्ट्रातील ग्राहक या स्कूटरकडे कार्यक्षमता, इंधन बचत आणि सुलभ मालकी यांचा समतोल साधणारा पर्याय म्हणून पाहतात. शहरी तसेच निमशहरी भागातील प्रवासासाठी तिची उपयुक्तता आणि टिकाऊपणा हे तिच्या लोकप्रियतेमागील प्रमुख कारण मानले जाते.

नवीन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक पर्याय

काळानुसार बदल स्वीकारत अॅक्टिव्हाने सातत्याने तंत्रज्ञानात सुधारणा केली आहे. अलीकडेच सादर करण्यात आलेल्या ACTIVA e: या इलेक्ट्रिक व्हर्जनमुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. कंपनीने ACTIVA e: आणि QC1 या इलेक्ट्रिक स्कूटर्सद्वारे ईव्ही सेगमेंटमध्येही प्रवेश केला आहे.

कंपनीची विस्तृत उत्पादन श्रेणी

कंपनीच्या स्कूटर श्रेणीत अॅक्टिव्हासोबत Dio स्कूटर 110cc, 125cc आणि 125-X व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. तर, मोटरसायकल विभागात कंपनीकडे 100–110cc: Shine 100, Shine 100 DX, Livo, 125cc: Shine 125, SP125, CB125 Hornet, 160cc: Unicorn, SP160 आणि 180–200cc: Hornet 2.0, NX200 आङे.

प्रीमियम BigWing शोरूम नेटवर्क

कंपनीचे प्रीमियम मोटरसायकल रिटेल नेटवर्क BigWing द्वारे देशातील प्रमुख शहरांमध्ये चालवले जाते. या नेटवर्कमधून 200cc ते 1800cc पर्यंतच्या प्रीमियम मोटरसायकली विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या श्रेणीत CB350, H’ness CB350, CB350RS, CB300F, CB300R, NX500, CB650R, CBR650R, XL750 Transalp, Hornet 1000 SP, X-Adv आणि Gold Wing Tour यांसारखी मॉडेल्स समाविष्ट आहेत.
 

Web Title : होंडा एक्टिवा ने रचा इतिहास: महाराष्ट्र में 50 लाख बिक्री का आंकड़ा पार

Web Summary : होंडा एक्टिवा ने महाराष्ट्र में 50 लाख बिक्री का आंकड़ा पार किया, जिसकी वजह प्रमुख शहरों में मांग रही। 700+ बिक्री और सेवा केंद्रों के साथ, एक्टिवा की विश्वसनीयता, ईंधन दक्षता और पुनर्विक्रय मूल्य इसकी लोकप्रियता में योगदान करते हैं। होंडा ने हाल ही में एक्टिवा ई: इलेक्ट्रिक संस्करण पेश किया।

Web Title : Honda Activa Achieves Milestone: 5 Million Sales in Maharashtra

Web Summary : Honda Activa reached 5 million sales in Maharashtra, driven by demand in major cities. With 700+ sales and service centers, Activa's reliability, fuel efficiency, and resale value contribute to its popularity. Honda introduced Activa e: electric version recently.