Ather Energy: हिरो मोटोकॉर्पचा डबलगेम! एथर एनर्जीमध्ये ४२० कोटींची गुंतवणूक; दुसरीकडे 'हिरो ईव्ही'शी वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:51 AM2022-01-15T10:51:25+5:302022-01-15T10:51:51+5:30

Hero investment in Ather: हिरो मोटोकॉर्पने एथरमध्ये तिच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक केलेली आहे. जवळपास २०१६ पासून हिरोने एथरमध्ये रस दाखविला आहे. आज एथरच्या स्कूटरचा खप एवढा नसला तरी बाजारातील उपस्थिती लक्षनिय आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये शोरुम आहेत. 

Hero MotoCorp's to invest 420 crore in Ather Energy; Dispute with 'Hero EV' brand name | Ather Energy: हिरो मोटोकॉर्पचा डबलगेम! एथर एनर्जीमध्ये ४२० कोटींची गुंतवणूक; दुसरीकडे 'हिरो ईव्ही'शी वाद

Ather Energy: हिरो मोटोकॉर्पचा डबलगेम! एथर एनर्जीमध्ये ४२० कोटींची गुंतवणूक; दुसरीकडे 'हिरो ईव्ही'शी वाद

Next

दुचाकी बनविणारी जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून बिरुदावली मिरविणारी हिरो मोटोकॉर्प मोठ्या पेचात सापडली आहे. स्वत:च्या नावाने ईलेक्ट्रीक स्कूटर भारतीय बाजारात आणू शकत नाही, कारण हिरो ग्रुपचे १० वर्षांपूर्वीच कुटुंबात विभाजन झाले आहे. हिरो कंपनी हिरो इलेक्ट्रीक हे नाव आपल्या उत्पादनांना लावू शकत नाही, असा दावा हिरो इलेक्ट्रीकने कोर्टात केला आहे. यामुळे मूळच्या हिरो कंपनीने वेगळाच गेम खेळला आहे. 

हिरो मोटोक़ॉर्पने (Hero MotoCorp) Ather Energy (एथर एनर्जी) मध्ये ४२० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची घोषणा केली आगे. 'बी द फ्यूचर ऑफ मोबिलिटी' व्हिजन लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे कंपनी सांगत असली तरी त्यामागचे इप्सित लपून राहिलेले नाही. हिरो मोटर्सची एथरमध्ये सुरुवातीपासूनच गुंतवणूक आहे. एथरचे जवळपास ३५ टक्के समभाग हिरोकडे आहेत. यामुळे जर हिरो मोटर्सला ईव्ही स्कूटर आपल्या नावे काढता आल्या नाहीत तर त्यांचा प्लॅन बी तयार आहे. या गुंतवणुकीमुळे हिरोची एथरमधील शेअर होल्डिंगही वाढणार आहे.

हिरो मोटोकॉर्पने एथरमध्ये तिच्या सुरुवातीपासूनच गुंतवणूक केलेली आहे. जवळपास २०१६ पासून हिरोने एथरमध्ये रस दाखविला आहे. आज एथरच्या स्कूटरचा खप एवढा नसला तरी बाजारातील उपस्थिती लक्षनिय आहे. मोठमोठ्या शहरांमध्ये शोरुम आहेत. 

खऱ्या हिरोची पहिली ईलेक्ट्रीक स्कूटर येणार...
Hero MotoCorp या वर्षी मार्च महिन्यात आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन (EV) सादर करण्यासाठी सज्ज आहे. हे वाहन कंपनीच्या जागतिक दर्जाचे R&D सेटअप - जयपूरमधील सेंटर ऑफ इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (CIT) आणि म्युनिकजवळील टेक सेंटर जर्मनी (TGG) येथे विकसित केले जात आहे. आणि त्याचे उत्पादन आंध्र प्रदेशातील चित्तूर येथील कंपनीच्या प्लांटमध्ये केले जाईल.

Web Title: Hero MotoCorp's to invest 420 crore in Ather Energy; Dispute with 'Hero EV' brand name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.