Hero Electric Photon ची रेंज 108 किमी; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि टॉप स्पीड...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2022 15:57 IST2022-09-12T15:56:49+5:302022-09-12T15:57:33+5:30
Hero Electric Photon : कमी बजेट आणि लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सध्याच्या रेंजपैकी एक म्हणजे हिरो इलेक्ट्रिक फोटॉन ( Hero Electric Photon) जी कमी किंमत, स्टाईल, फीचर्स आणि लांब रेंजमुळे बाजारात यश मिळवत आहे.

Hero Electric Photon ची रेंज 108 किमी; जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि टॉप स्पीड...
नवी दिल्ली : देशातील दुचाकी क्षेत्रात इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईकची (Electric Scooter and Bike) रेंज खूप मोठी झाली आहे, ज्यामध्ये विविध किंमती आणि फीचर्ससह ई-स्कूटर आणि बाईक सहज मिळत आहेत. कमी बजेट आणि लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या सध्याच्या रेंजपैकी एक म्हणजे हिरो इलेक्ट्रिक फोटॉन ( Hero Electric Photon) जी कमी किंमत, स्टाईल, फीचर्स आणि लांब रेंजमुळे बाजारात यश मिळवत आहे.
जर तुम्हाला ही स्कूटर आवडली असेल आणि तुम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही हिरो इलेक्ट्रिक फोटॉनची किंमत, फीचर्स, रेंज, स्पेसिफिकेशनसह प्रत्येक माहिती देत आहोत. कंपनीने हिरो इलेक्ट्रिक फोटॉनची सुरुवातीची किंमत 80,790 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) सह बाजारात आणली आहे. ऑन-रोड असताना ही एक्स-शोरूम किंमत 84,566 रुपये आहे.
बॅटरी आणि पॉवरबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये 1.87 kWh क्षमतेची लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. या बॅटरीसोबत 1200 W पॉवरची BLDC मोटर जोडलेली आहे. कंपनीच्या मते, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर हा बॅटरी पॅक 5 तासांत पूर्ण चार्ज होतो. कंपनी या बॅटरी पॅकवर 3 वर्षांची वॉरंटी देखील देते. हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 108 किलोमीटरची रेंज देते. या रेंजसह, कंपनीने 45 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड मिळवण्याचा दावा केला आहे.
काय आहेत फीचर्स?
हिरो इलेक्ट्रिक फोटॉनला कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे, ज्यामध्ये स्कूटरच्या पुढील आणि मागील दोन्ही चाकांमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. यासोबत अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर जोडण्यात आले आहेत. सस्पेन्शन सिस्टीममध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस स्प्रिंग बेस्ड शॉक अब्जॉर्बर सिस्टम देण्यात आली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर कंपनीने डिजिटल क्लॉक, डिजिटल स्पीडोमीटर, रिमोट स्टार्ट, पुश बटण स्टार्ट, अँटी थेफ्ट अलार्म, पास स्विच, ईबीएस, डीआरएल, लो बॅटरी इंडिकेटर, बॅटरी स्पायिंग यांसारखे फीचर्स दिले आहेत.