शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

22.05 kmpl चं मायलेज, 'ही' ठरली देशातील बेस्ट सेलिंग कार; किंमत ३ लाखांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 2:30 PM

स्वस्त आणि मस्त कार घ्यायचा विचार करत असाल तर हा ठरू शकतो बेस्ट ऑप्शन

ठळक मुद्देगेल्या महिन्यात या कारच्या 18,260 युनिट्सची झाली विक्रीठरली देशातील सर्वाधिक विक्री झालेली कार

नवं वर्ष हे ऑटो क्षेत्रासाठी चांगली बातमी घेऊन आलं आहे. देशात प्रवासी वाहनांच्या किंमतीत तब्बल 17.7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. जानेवारी महिना हा प्रामुख्यानं कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीसाठी चांगला ठरला आहे. मारूती सुझुकीची छोटी कार Alto हे देशातील बेस्ट सेलिंग कार ठरली आहे. गेल्या वर्षीही ग्राहकांनी या कारला पसंत केलं होतं. ग्राहकांच्या वाढत्या पसंतीमुळेच वर्षांच्या पहिल्याच महिन्यात बेस्ट सेलिंग कारचा बहुमान या ऑल्टोनं मिळवला आहे. या कारची किंमत, मायलेज आणि योसोबत मिळणारे फीचर्स प्रामुख्यानं या कारला खास बनवतात. भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांच्या यादीत मारूती सुझुकीच्या ऑल्टो या कारनं पहिला क्रमांक पटकावला आहे. जानेवारी महिन्यातच या कारच्या जवळपास 18,260 युनिट्सची विक्री झाली. जानेवारी 2020 च्या तुलनेत ही संख्या थोडी कमी असली तरी या वर्षी जानेवारी महिन्यात विक्री झालेल्या कारच्या यादीत ही पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या कारच्या 18,914 युनिट्सची विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गाडीच्या विक्रीत 3 टक्क्यांची घट झाली आहे. किती आहे किंमत?मारूती सुझुकी ऑल्टो 800 ही एकूण 8 व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ऑल्टोचे बेस मॉडेल एसटीडी आणि ऑल्टोचं हाय व्हेरिअंट मॉडेल ऑल्टो 800 एलएक्सआय opt s-cng आहे. ऑल्टोची दिल्लीतील सुरूवातीच्या व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत 2 लाख 94 हजार 800 रूपये आहे. तर या कारचं टॉप मॉडेल 4 लाख 36 हजार 300 रूपयांचं आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. 

स्पेसिफिकेशन आणि मायलेजAlto चा 796cc 12 वॉल्व, 3 सिलिंडर BS6 पेट्रोल इंजिन 35.3 KW पॉवर आणिर 69 Nm चा टॉर्क जनरेट करतो. या इंजिनसह ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनदेखील आहे. ऑल्टोचं पेट्रोल व्हेरिअंट जवळपास 22.05 kmpl चं मायलेज देतं. तर दुसरीकडे ऑल्टोच्या सीएनजी इंजिनबाबत सांगायचं झालं तर या व्हर्जनमध्ये इंजिन 30.1 kW पॉवर आणि 60 Nm चा टॉर्क जनरेट करते. सीएनजी व्हर्जनचं मायलेज 31.59 किमी प्रति किलोग्राम इतकं आहे. ऑल्टोमध्ये ड्युअल एअर बॅग्स, ड्रायव्हक आणि को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमांईंडर, ABS+EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम, इमोबिलायझर आणि रिअर डोअर चाईल्ड लॉकसारखे सेफ्टी फीचर्सही देण्यात आले आहेत.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकारIndiaभारतAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग