शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

हझार्ड फ्लॅशरचा वापर धुक्यातील रस्त्यावर सिग्नल देण्यासाठी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 16:54 IST

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर थंडी वा पावसामध्ये धुक्याच्यावेळी अनेक कारचालक व वाहनचालक हे वाहनामध्ये लावलेल्या हझार्ड फ्लॅशरचा वापर मागच्या वाहनाला संकेत देण्यासाठी करीत असतात.

ठळक मुद्देसाईड इंडिकेटर्स असणाऱ्या दिव्याला फ्लॅशरची सुविधा दिलेली असते.साईट इंडिकेटरची ही फ्लॅशरची ही कृती केल्यानंतर तुम्हाला साईड इंडिकेटरचा वापर करता येत नाहीहझार्ड फ्लॅशर वा पार्किंग लाइट कधी लावायचा हे प्रत्येकाने नीटपणे अवलंबायला हवे.

मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर थंडी वा पावसामध्ये धुक्याच्यावेळी अनेक कारचालक व वाहनचालक हे वाहनामध्ये लावलेल्या हझार्ड फ्लॅशरचा वापर मागच्या वाहनाला संकेत देण्यासाठी करीत असतात. ही अतिशय चुकीची कृती असून त्याबाबत प्रत्येक वाहनचालकाने त्या सिग्नलचा वापर कशासाठी करतो आहोतस हे समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक कारला साईड इंडिकेटर्स दिलेले असतात. या साईड इंडिकेटर्सद्वारे आपल्याला उजव्या वा डाव्या बाजूला जायचे असेल तर स्टिअिरंग व्हीलला संलग्न असणारा एक स्विच आपण त्यानुसार ऑपरेट करीत असतो. याच साईड इंडिकेटर्स असणाऱ्या दिव्याला फ्लॅशरची सुविधा दिलेली असते. त्यासाठी त्रिकोणी लाल रंगाचे बटन स्वतंत्रपणे दिलेले असते. हे बटण पार्किंग इंडिकेशनचे आहे. त्याचप्रमाणे ते हझार्ड फ्लॅशर म्हणून वापरले जाते. ते दाबल्यानंतर कारचे वा वाहनाचे सर्वच्या सर्व साईड इंडिकेटर्स चालू होऊन उघडझाप करू लागतात. केशरी पिवळ्या रंगाच्या या साईट इंडिकेटरची ही फ्लॅशरची ही कृती केल्यानंतर तुम्हाला साईड इंडिकेटरचा वापर करता येत नाही. त्यामुळे कार डाव्या बाजूला वळवायची असेल किंवा उजव्या बाजूला वळवायची असेल तर तसा संकेत मागच्या वा समोरून येणाऱ्या वाहनाला मिळू शकत नाही. हे हझार्ड फ्लॅशर चालू कशासाठी करायचे ते समजून घेणे गरजेचे आहे. धुक्यामध्ये मागील वा समोरून येणाऱ्या वाहनाला तुमची कार असल्याचे समजावे यासाठी तुम्ही हेडलॅम्प सुरू केला की तुमचा टेललॅम्पही सुरू होत असतो,ते संकेत धुक्यामध्ये वा पावसामध्ये पुरेसे आहेत. हझार्ड फ्लॅशर जरी लावला तर मात्र तुम्हा तुमच्या मोटारीचा वेग अतिशय कमी ठेवून अन्य मोटारींना पुढे जाण्यासाठी जागा करून द्यावी लागते, असा संकेत आहे. धुक्यात वा मुसळधार पावसामध्ये अन्य वाहनांना तुमच्या वाहनाचे अस्तित्त्व कळावे व अपघात वा धडक टळावी, यासाठी हेडलॅम्प डिप्परमध्ये ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे मागील टेल लॅम्पही लागले जातात व मागील वाहनालाही तुम्ही पुढे असल्याचे समजते.हझार्ड फ्लॅशर हा नेमका कशासाठी असतो, तर तुम्ही रस्त्याच्या बाजूला कार नेऊन थांबवल्यानंतर वा थांबवत आहात, त्यावेळी तो लावावा. पार्किंग केलेल्या स्थितीत अन्य वाहनांना तुमचे अस्तितत्त्व कळावे, यासाठी हा हझार्ड फ्लॅशर वा पार्किंग लाइट लावायला हवा. तो उघडझाप करीत मागील वाहनांना वा रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य वाहनांना त्याबाबत कल्पना देतो. संकेत देतो. त्याचप्रमाणे तुमच्या वाहनामध्ये काही समस्या निर्माण झाली आहे, तुमची कार वा वाहन चालू आहे, पण काही ना काही समस्या असल्याने तुम्हाला रस्त्यावरून वाहन चालवत जावे लागणे अपिरहार्य असेल तर तुमच्या रांगेत तुम्ही मागून येणाऱ्या अन्य वाहनांना अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने कार चालवत अतिशय कमी वेगामध्ये एका सरळ रेषेत वा रस्त्याच्या एका बाजूने कार चालवणे अभिप्रेत असते. हा विषय इतका महत्त्वाचा आहे, की अनेकदा धुक्याच्या वा पावसाच्या वातावरणामध्ये रात्री वा दिवसाही जवळच्या अंतरावरची स्थिती चांगल्या रीतीने दृश्यमान नसल्याने वाहन हझार्ड फ्लॅशर लावून जास्त वेगाने वा ताशी २० पेक्षाही जास्त वेगाने चालवले जाते. मुंबई – पुणे महामार्ग असो की अन्य कोणताही महामार्ग वा रस्ता असो आजकाल धुक्याच्या वा पावसाळी वातावरणात हझार्ड फ्लॅशर लावून कार व वाहने चावलवण्याची एक अतिशय धोकादायक पद्धत अवलंबली जात आहे. जर हझार्ड फ्लॅशर लावला तर वेग अतिशय कमी ठेवणे गरजेचे असते. पण अनेकजण तसे न करता अगदी नेहमीच्या पद्धतीने गाडी चालवीत राहातात. मात्र अशावेळी उजव्या किंवा डाव्या बाजूला वळायचे असेल तर तुम्हाला मागील वा समोरून येणाऱ्या वाहनांना कोणताही संकेत देता येत नाही आणि त्यामुळे गैरसमज होऊन अपघात होण्याचीही शक्यता असते. मागील वाहनांना या प्रकारामुळे गोंधळायला होते.यासाठी हझार्ड फ्लॅशर वा पार्किंग लाइट कधी लावायचा हे प्रत्येकाने नीटपणे अवलंबायला हवे.

टॅग्स :Automobileवाहनcarकार