शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

गोव्यात इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर मिळणार सबसिडी, पाच वर्षांपर्यंत रोड टॅक्सवर मिळेल सूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2021 5:19 PM

Goa launches EV policy : गोव्यातील अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही पॉलिसी जारी केली.

गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Chief Minister Pramod Sawant)  यांनी शनिवारी इलेक्ट्रिक वाहनांच्या (Electric Vehicles) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा इलेक्ट्रिसिटी मोबिलिटी प्रमोशन पॉलिसी-2021  (Goa Electricity Mobility Promotion Policy 2021) लाँच केली. गोव्यातील अवजड उद्योग मंत्रालयाने इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देण्यासाठी आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही पॉलिसी जारी केली.

रोड टॅक्समध्ये सूट बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे आणि राज्यातील लोकांना रोजगार निर्मिती करणे हा या पॉलिसीचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. पॉलिसी अंतर्गत मिळणाऱ्या लाभांबाबत ते म्हणाले, आम्ही उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देत आहोत. गोव्यात नोंदणीकृत  सर्व श्रेणीतील ई-वाहनांवर पाच वर्षांपर्यंत रोड टॅक्समध्ये सूट देण्यात येत आहे.

महामार्गावर दर 25 किमी अंतरावर चार्जिंग स्टेशनमुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, राज्य सरकार ई-वाहन खरेदी करणाऱ्यांना सबसिडी देईल आणि चार्जिंग पायाभूत सुविधा उभारेल. महामार्गावर दर 25 किमी अंतरावर चार्जिंग स्टेशन असणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. तसेच, शहरातील चार्जिंग स्टेशन महामार्गापेक्षा कमी अंतरावर असतील.

पॉलिसी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सबसिडीबद्दल विचारले असता मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, आमची पॉलिसी दोन, तीन आणि चार चाकी ई-वाहनांसाठी आहे. दुचाकी वाहनांसाठी 30 टक्के आणि तीन चाकी वाहनांसाठी 40 टक्के आहे. चारचाकी वाहनांसाठी आम्ही तीन लाखापर्यंत देऊ.

10 हजार लोकांना मिळेल रोजगार'आधी या, आधी घ्या' तत्त्वावर जवळपास 400 वाहनांना हा लाभ देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, या पॉलिसीमुळे राज्यात 10,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील. 

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनgoaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतAutomobileवाहन