शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
2
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
3
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
4
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
5
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
6
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
7
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
8
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
9
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
10
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
11
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
12
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
13
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
14
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
15
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
16
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
17
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
18
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
19
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
20
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
Daily Top 2Weekly Top 5

जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 18:05 IST

चौकशीवेळी सेबीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी हा प्रकल्प केवळ कागदावरच आहे असे दिसून आले.

जेनसोल या ईलेक्ट्रीक व्हेईकल बनविणाऱ्या कंपनीने खूप मोठा घोटाळा केला आहे. मालक गुंतवणूकादारांच्या पैशांवर ऐश करत होते, हे समोर आले आहे. सेबीना या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. जेनसोलने पुण्यात ईव्ही बनविण्याचा प्रकल्प टाकला होता, परंतू तो सुरुच नाहीय. आम्हाला तिथे दोन-तीन मजूर सापडले, असे सेबीने म्हटले आहे.  चौकशीवेळी सेबीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी हा प्रकल्प केवळ कागदावरच आहे असे दिसून आले. या प्रकल्पात उत्पादन सुरुच नव्हते. या प्रकल्पाचे लाईट बिलही खूप कमी येत होते. केवळ दोन-तीन मजूर आतमध्ये होते. यावरून या प्रकल्पात काही काम चालत नाही हे समोर आल्याचे सेबीने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

शेअर्सच्या किमतींमध्ये फेरफार आणि निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपांच्या तक्रारीनंतर ही चौकशी सुरू करण्यात आली होती. एका ऑटो एक्स्पोमध्ये ३०,००० ईव्हीसाठी प्री-बुकिंग मिळाले होते, असा दावा जेनसोलने केला होता. प्रत्यक्षात ते लेटर ऑफ इंटेंट (एमओयू) होते, यात ना किंमत ना तपशीलाचा उल्लेख होता. काही कंपन्यांसोबतचे केवळ सामंजस्य करार होते ज्यात वाहनांची किंमत किंवा डिलिव्हरीची तारीख निश्चित केलेली नव्हती. सेबीला जून २०२४ मध्ये तक्रार मिळाली होती. सेबीने आदेश दिल्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) च्या एका अधिकाऱ्याने ९ एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील चाकण येथील जेनसोलच्या ईव्ही प्लांटला भेट दिली. तिथे फक्त २-३ कामगार आढळले. तेथे कोणतेही बांधकामही सुरु नसल्याचे स्पष्ट झाले. 

जेनसोलने सरकारकडून ९७७ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते, त्यापैकी ६६३ कोटी रुपये इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्यासाठी होते. कंपनीने सांगितलेले की ४,७०४ वाहने खरेदी केली आहेत आणि त्यावर ५६७ कोटी रुपये खर्चही केले. परंतू, उरलेल्या २६२ कोटी रुपयांचा कोणताही हिशेब देण्यात आला नव्हता. काही पैसे महागडे अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी, नातेवाईकांना देण्यासाठी आणि वैयक्तिक खर्चासाठी वापरण्यात आले. तसेच मोठी रक्कम प्रवर्तकांच्या खात्यात वळती करण्यात आली होती.  सेबीने जेनसोल आणि त्यांच्या प्रवर्तकांना शेअर बाजारातून बंदी घातली आहे. तसेच, अनमोल आणि पुनीत जग्गी यांना कंपनीत कोणतेही महत्त्वाचे पद भूषविण्यास मनाई करण्यात आली आहे. कंपनीची १:१० स्टॉक स्प्लिट योजना देखील थांबवण्यात आली आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरSEBIसेबी