शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

याची झेरॉक्स ठेवा! खात्यात पैसे आहेत, पण FASTag स्कॅन झाला नाही, टोलनाक्यावरून फुकटात जा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 13:59 IST

Money in wallet but Fastag not Scanned? here is solution : केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून फास्टॅग (FASTag) सर्व वाहनांना आवश्यक केला आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून फास्टॅग अस्तित्वात असला तरीदेखील टोल प्रणालीतील दोष काही सरकारला आणि संबंधित यंत्रणेला दूर करता आलेले नाहीत. दुप्पल टोल भरावा लागेल म्हणून जवळपास 75 टक्के वाहनचालकांनी फास्टॅग लावलेले आहेत.

केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून फास्टॅग (FASTag) सर्व वाहनांना आवश्यक केला आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून फास्टॅग अस्तित्वात असला तरीदेखील टोल प्रणालीतील दोष काही सरकारला आणि संबंधित यंत्रणेला दूर करता आलेले नाहीत. दुप्पल टोल भरावा लागेल म्हणून जवळपास 75 टक्के वाहनचालकांनी फास्टॅग लावलेले आहेत. मात्र, खात्यात पैसे असूनही ते कापले न गेल्याने टोलनाक्यावर दुप्पट पैसे भरावे लागल्य़ाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यावर आता एमएसआरडीसीने खुलासा केला आहे. (Fastag Scan fail then vehicle user shall be permitted to pass the fee plaza without payment of any user fee. An appropriate zero transaction receipt shall be issued mandatorily for all such transaction.)

FASTag problems: टोल दोनदा कापला तर काय? FASTag बाबत अद्याप न पडलेले प्रश्न...केंद्र सरकारने यासाठी तरतूद करून ठेवली आहे. केंद्र सरकारने काढलेल्या जीआरमध्ये असे म्हटले आहे की, जर तुमच्या फास्टॅगच्या वॉलेटमध्ये पैसे आहेत आणि हा फास्टॅग स्कॅन करण्यात अडचण आली तर टोलनाक्यावर टोल भरण्याची गरज नाही. याला एमएसआरडीसीचे संचालक राधेश्याम मोपलवार यांनीदेखील दुजोरा दिला आहे. 

एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरेसंदीप खरेंनी मांडला मुद्दा...प्रसिद्ध कवी आणि गायक संदीप खरे यांना पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी टोलनाक्यावर अत्यंत वाईट अनुभव आला. हा प्रकार त्यांनी फेसबुकद्वारे सांगितला आहे. माझ्या गाडीवरील FASTag स्कॅन न झाल्याने टोल प्लाझावरील कर्मचाऱ्याने गाडी थांबवली. त्यानंतर एका छोट्या मशीनने तो टॅग स्कॅन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झाला नाही. त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागेल, असं सांगण्यात आलं. यात टोल ७५ आणि दंड ७५ रुपये अशी रक्कम भरण्यास सांगण्यात आले. त्यावर माझ्याकडे फास्टॅग असल्याने मी भरणार नसल्याची भूमिका घेतली, असं संदीप खरे यांनी व्हिडिओद्वारे सांगितले.

IMP बातमी! FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही; केंद्राचा मोठा नियम बदलयानंतर लोकमतच्या प्रतिनिधीने एमएसआरडीसीचे संचालक मोपलवार यांच्याशी संपर्क साधला, तसेच त्यांना हा जीआर दाखविला. तेव्हा त्यांनी दुप्पट टोल आकारता येत नसल्याचे सांगत जर तुमच्या फास्टॅगमध्ये पुरेसे पैसे असतील आणि तुमचा फास्टॅग स्कॅन झाला नाही तर टोल भरण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे.  अशी तांत्रिक अडचण आल्यास वाहन चालकाला शून्य टोलची पावती द्यावी लागणार आहे, असेही या आदेशात नमूद आहे. खरेतर हा आदेश 2018 मध्येच काढण्यात आलेला आहे, तरीही वाहनचालकांची टोलनाक्यांवर लूट केली जात आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता वाहन चालकांना पडला आहे. 

याची झेऱॉक्स नक्की गाडीत काढून ठेवा....

 

 

टॅग्स :Fastagफास्टॅगtollplazaटोलनाकाMSRDCराज्य रस्ते विकास महामंडळMONEYपैसाsandeep khareसंदीप खरेkolhapurकोल्हापूर