भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजार सध्या वेगाने विस्तारताना दिसत आहे. येथे अनेक परदेशी कंपन्याही आपले नशीब आजमावत आहेत. व्हिएतनामच्या 'विनफास्ट'नंतर, आता चीनची दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी 'बेस्ट्यून' (Bestune) आपल्या स्वस्त आणि दमदार रेंज असलेल्या कारसह भारतात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने चिनी बाजारपेठेत आपली 'शाओमा' (Xiaoma) ही मायक्रो इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. या कारने कमी किंमती आणि ढासू रेंजमुळे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे.
बेस्ट्यून शाओमाची किंमत आणि रेंज -बेस्ट्यून शाओमाची किंमत ३०००० ते ५०००० युआन म्हणजे सुमारे ३.४७ लाख ते ५.७८ लाख रुपयांपर्यंत आहे. महत्वाचे म्हणजे, ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर तब्बल १२०० किमीपर्यंत धावू शकते. हा कार भारतात लाँच झाल्यास, टाटा टियागो EV आणि एमजी कॉमेट EV शी तिचा थेट सामना होईल.
काही खास फिचर्स आणि बॅटरी -ही कार 'FME' प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे. या मध्ये A1 आणि A2 असे दोन सब-प्लॅटफॉर्म आहेत. A1 २७००–२८५० मिमी व्हीलबेस असलेल्या सबकॉम्पॅक्ट आणि कॉम्पॅक्ट वाहनांसाठी आहे. A2 चा वापर २७००–३००० मिमी व्हीलबेस असलेल्या गाड्यांसाठी केला जातो. EV ची रेंज ८०० किमी एवढी असून तीची एक्सटेंडरची रेंज १२०० किमी पेक्षाही अधिक आहे. दोन्ही प्लॅटफॉर्म ८०० V आर्किटेक्चरला सपोर्ट करतात. यात २० किलोवॅटची सिंगल इलेक्ट्रिक मोटर आणि लिथियम-आयरन फॉस्फेट (LFP) बॅटरी वापरण्यात आली आहे.
सुरक्षिततेचा विचार करता, ड्रायव्हर साइड एअरबॅग देण्यात आली आहे. ३००० मिमी लांबी, १५१० मिमी रुंद आणि १६३० मिमी उंची असलेल्या या ३-डोर कारमध्ये ७ इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि आकर्षक ड्युअल-टोन डॅशबोर्ड थीम देण्यात आली आहे. सध्या या कारचे हार्डटॉप व्हेरिएंट विक्रीसाठी उपलब्ध असून भविष्यात कन्व्हर्टिबल व्हेरिएंट येण्याचीही शक्यता आहे. अॅनिमेशन फिल्ममधील कारसारखी दिसणारी ही छोटी कार भारतीय ग्राहकांच्या बजेटमध्ये फिट बसू शकते.
Web Summary : China's Bestune enters India with the Xiaoma EV, boasting a 1200km range and a starting price of ₹3.47 lakh. This compact EV features a 7-inch touchscreen, LFP battery, and promises to compete with Tata Tiago EV and MG Comet EV.
Web Summary : चीन की बेस्ट्यून ने शाओमा ईवी के साथ भारत में एंट्री की है, जिसकी रेंज 1200 किमी और शुरुआती कीमत ₹3.47 लाख है। इस कॉम्पैक्ट ईवी में 7 इंच का टचस्क्रीन, एलएफपी बैटरी है, और टाटा टियागो ईवी और एमजी कॉमेट ईवी को टक्कर देने का वादा करती है।