महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:25 IST2025-07-30T13:21:55+5:302025-07-30T13:25:13+5:30
Mahindra Vision SXT Pickup: महिंद्रा व्हिजन एसएक्सटीचा नवीन टीझर समोर आला आहे.

महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
महिंद्रा लवकरच भारतात त्यांची नवीन पिकअप व्हिजन एसएक्सटी लॉन्च करण्याची तयारी करत आहे. नुकताच कंपनीने पिकअप व्हिजन एसएक्सटीचा टीझर रिलीज केला आहे. हा तोच पिकअप ट्रक आहे, जो २०२३ मध्ये पहिल्यांदा स्कॉर्पिओ-एन पिकअप म्हणून जागतिक लॉन्च करण्यात आला होता. महिंद्राने आपल्या जुन्या पिकअपच्या तुलनेत नव्या पिकअपमध्ये मोठा बदल केल्याचे टीझरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
महिंद्रा व्हिजन एसएक्सटी हा स्कॉर्पिओ-एनच्या प्लॅटफॉर्मवर बनवलेला एक नवीन कॉन्सेप्ट पिकअप ट्रक आहे. तो त्याच्या बेस मॉडेलपेक्षा अधिक आधुनिक आहे. शिवाय त्यात अनेक तांत्रिकदृष्ट्या प्रगत फीचर्स देखील समाविष्ट आहेत. महिंद्रा व्हिजन एसएक्सटी केवळ पेट्रोल किंवा डिझेल आवृत्त्यांमध्येच नाही तर ऑल-इलेक्ट्रिक व्हेरिएंटमध्ये देखील लॉन्च करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती आहे.
महिंद्राने प्रसिद्ध केलेल्या टीझरमध्ये व्हिजन एसएक्सटी पिकअपचा मागील भाग दिसला, त्यात दोन बूट-माउंटेड स्पेअर व्हील्स दिसत आहेत. यासोबतच, टीझरमध्ये टू-पीस टेलगेट ओपनिंग देखील दाखवण्यात आले, जे या सेगमेंटमध्ये प्रॅक्टिकल आणि युजर फ्रेन्डली फीचर मानले जाते. यावरून असे स्पष्ट होते की, महिंद्राने व्हिजन एसएक्सटी केवळ स्टायलीश गाडी म्हणून डिझाईन केली नाही तर, वापरकर्त्यांच्या गरजा लक्षात घेऊन बनवण्यात आली आहे.
महिंद्रा व्हिजन एसएक्सटीचे अधिकृत पदार्पण लवकरच अपेक्षित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पिकअप ट्रक ऑटो एक्स्पो २०२६ मध्ये लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. महिंद्रा व्हिजन एसएक्सटी बाजारात दाखल झाल्यानंतर थेट थार, गुरखा आणि टोयोटा हिलक्ससारख्या वाहनांशी स्पर्धा करेल, असा दावा कंपनीकडून केला जात आहे.