शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध, पाडवा आणि सबसिडी संपण्याची धास्ती...! लोक इलेक्ट्रीक वाहनांवर तुटून पडले, आजपर्यंत नाही झालेला असा सेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 11:03 IST

EV Sales March 2026 India : "तुम्ही या महिन्यात इलेक्ट्रिक गाडी खरेदी केली का?" भारतीय ईव्ही मार्केटमध्ये मार्च २०२६ मध्ये रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आहे. इलेक्ट्रिक कार विक्री ४९% तर टू-व्हीलर ३६% ने वाढल्या आहेत. CAFE-2 मानके आणि सबसिडी बदलाचा हा परिणाम.

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मार्च २०२६ हा महिना 'ईव्ही क्रांती'चा साक्षीदार ठरला आहे. केंद्र सरकारच्या 'PM E-DRIVE' योजनेची सबसिडी ३१ मार्च रोजी संपणार असल्याने, स्वस्त दरात इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी शोरूममध्ये एकच गर्दी केली होती. यामुळे मार्च महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

ताज्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारतात २१ लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आहे. एकट्या मार्च महिन्यात टू-व्हीलर सेगमेंटमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. टीव्हीएस, बजाज आणि एथर यांसारख्या कंपन्यांनी विक्रीत बाजी मारली आहे.

विक्रमी आकडेवारीवर एक नजर

मार्च २०२६ मध्ये नोंदणी झालेल्या वाहनांची संख्या थक्क करणारी आहे:

  • इलेक्ट्रिक कार: १९,७११ युनिट्स (४९% वाढ)

  • इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स: १,७७,४८५ युनिट्स (३६% वाढ)

  • वार्षिक वाढ: संपूर्ण आर्थिक वर्ष २६ (FY26) मध्ये इलेक्ट्रिक कारची विक्री ८२ टक्क्यांनी वाढून २ लाख युनिट्सच्या जवळ पोहोचली आहे.

ग्राहकांच्या घाईचे मुख्य कारण१ एप्रिल २०२६ पासून ईव्ही सबसिडीच्या नियमांत बदल होणार असल्याने गाड्यांच्या किमती वाढण्याची शक्यता होती. यामुळे कंपन्या ग्राहकांना तसेच सांगत होत्या. यामुळे ग्राहकांनी किंमत वाढण्याच्या भीतीतून खरेदी केली. अखेर महिन्याच्या शेवटी केंद्र सरकारने सबसिडीची मुदत वाढविली. ३१ मार्च ही सबसिडी मिळवण्याची शेवटची तारीख होती. १ एप्रिलपासून अनेक कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि कारच्या किमती २% ते ५% पर्यंत वाढवण्याचे संकेत दिले आहेत.मार्च अखेर असल्याने कंपन्यांनी जुना स्टॉक संपवण्यासाठी १ लाख ते १० लाख रुपयांपर्यंतचे 'मेगा मार्च' डिस्काउंट दिले होते. एथरच्या रिझ्टावर कधी नव्हे तो ४००० रुपयांचा डिस्काऊंट मिळत होता.

पुढील वाटचाल: एप्रिलमध्ये काय बदलणार?तज्ज्ञांच्या मते, मार्चमधील या विक्रमी खरेदीनंतर एप्रिल महिन्यात विक्रीत थोडी घट होऊ शकते. मात्र, सरकारने आता गुणवत्तेवर आधारित प्रोत्साहन देण्यावर भर दिला असल्याने, भविष्यात अधिक दर्जेदार आणि जास्त रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात येतील.

English
हिंदी सारांश
Web Title : Electric Vehicle Sales Surge in March Amid Subsidy Deadline Fears

Web Summary : Driven by subsidy expiry fears, electric vehicle sales soared in March, breaking records. Two-wheeler sales led the charge, with TVS and Bajaj dominating. Over 2.1 million EVs registered in FY26. Consumers rushed purchases fearing price hikes, fueled by discounts before subsidy extension.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर