शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

आता सरकारी अधिकारी अन् मंत्र्यांसाठी अनिवार्य होणार इलेक्ट्रिक वाहन! केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले...

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 19, 2021 6:52 PM

आपण घरगुती गॅसवर पहिल्यापासूनच सब्सिडी देत आहोत. पण, आपण अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक उपकरणांवर सब्सिडी का देत नाहीत?

ठळक मुद्देसर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य करायला हवीत - गडकरी केंद्रीय वीजमंत्री आरके सिंह यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहन अनिवार्य करावित - गडकरीआपण अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक उपकरणांवर सब्सिडी का देत नाहीत? - गडकरी

नवी दिल्ली - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी शुक्रवारी मंत्रालये आणि विभागांतील सर्व अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric vehicles) वापर अनिवार्य व्हायला हवा, असे म्हटले आहे. एवढेच नाही, तर सरकारने गरिबांना स्वयंपाकाच्या गॅसवर सब्सिडी देण्याऐवजी विजेवर चालणारी आणि स्वयंपाकासाठी उपयुक्त असलेली  उपकरणे विकत घेण्यासाठी मदत करायला हवी, अशी सूचनाही गडकरी यांनी केली आहे. ते ‘गो इलेक्ट्रिक’ अभियानाला सुरुवात करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. (Electric vehicles usage should be mandatory for govt officials and Ministers)

पेट्रोल-डिझेल शंभरी पार; बाबा रामदेव म्हणतात, "...तर सायकलचा ट्रेंड सुरू करा!"

गडकरी म्हणाले, आपण घरगुती गॅसवर पहिल्यापासूनच सब्सिडी देत आहोत. पण, आपण अन्न शिजवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक उपकरणांवर सब्सिडी का देत नाहीत? विजेवर अन्न शिजविण्याची प्रणाली स्वच्छ आहे. तसेच यामुळे गॅसची अयातही कमी होईल.

इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य करावीत -सर्व सरकारी अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहने अनिवार्य करायला हवीत, अशी सूचना गडकरी यांनी केली आहे. यावेळी केंद्रीय वीजमंत्री आरके सिंह यांनी आपल्या विभागातील अधिकाऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहन अनिवार्य करावित, असा आग्रहही गडकरी यांनी केला. तसेच आपल्या विभागातील अधिकाऱ्यांसाठीही असा निर्णय घेऊ, असेही गडकरी म्हणाले.

आता देशातून पेट्रोल डिझेलला राम-राम ठोकण्याची आली वेळ? केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले...

गडकरी म्हणाले, एकट्या दिल्लीत 10 हजार इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला गेला, तर दर महिन्याला 30 कोटी रुपयांची बचत होऊ शकते. यावेळी, आरके सिंह यांनी दिल्ली-आगरा आणि दिल्ली-जयपूर मार्गांवर ‘फ्यूल सेल’ बस सुरू केली जाणार असल्याची घोषणा केली.

विजेला पर्यायी इंधन म्हणून उत्तेजन दिले जाऊ शकते -तत्पूर्वी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितिन गडकरी म्हणाले होते, देशात विजेला पर्यायी इंधन म्हणून उत्तेजन दिले जाऊ शकते. येणाऱ्या काळासाठी हा शूभसंकेत आहे. आपले मंत्रालय पर्यायी ईंधनावर संपूर्ण शक्तीनीशी काम करत आहे. माझा सल्ला आहे, की आता देशात पर्यायी इंधनाची वेळ आली आहे. मी पहिल्यापासूनच, इंधन म्हणून इलेक्ट्रिसिटीला पसंती देण्यासंदर्भात बोलत आहे. कारण आपल्याकडे आवश्यकतेहूनही अधिक वीज आहे, असेही गडकरी म्हणाले होते.

भूतानमध्ये भारतातूनच इंधन जाते, तिथे आपल्यापेक्षा निम्मीच किंमत; काँग्रेस, स्वामींनी भाजपाला घेरले

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAutomobileवाहनministerमंत्रीCentral Governmentकेंद्र सरकारelectricityवीजcarकार