मार्च संपण्यापूर्वीच ईलेक्ट्रीक स्कूटर विक्रीचा आकडा आला; वर्षाची विक्री ६ टक्क्यांनी पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 21:27 IST2025-03-31T21:21:02+5:302025-03-31T21:27:16+5:30
१७६० समस्या आणि वेळेत सर्व्हिस न देऊ शकणाऱ्या बजाज चेतकने पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे. तर सर्व्हिसमुळे आणखी एक बदनाम असलेली कंपनी ओलाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

मार्च संपण्यापूर्वीच ईलेक्ट्रीक स्कूटर विक्रीचा आकडा आला; वर्षाची विक्री ६ टक्क्यांनी पडली
फेब्रुवारी महिन्यात विक्रीची खोटी आकडेवारी दिल्याच्या कारणाने केंद्र सरकारच्या नोटीसांवर नोटीसा घेणाऱ्या ओलाला या महिन्यातही फारसे काही करता आलेले नाहीय. मार्च महिन्यातील ईलेक्ट्रीक दुचाकी बाजारातील विक्रीचा आकडा आला आहे. यामध्ये वेळेत सर्व्हिस न देऊ शकणाऱ्या बजाज चेतकने पुन्हा एकदा बाजी मारलेली आहे. तर सर्व्हिसमुळे आणखी एक बदनाम असलेली कंपनी ओलाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे.
बजाजने चेतकच्या ३०१३३ युनिट विकल्या आहेत. टीव्हीएस आयक्यूबच्या २६४८१ युनिट विकल्या गेल्या आहेत. ओला ईलेक्ट्रीकला २२६८५ युनिट विकता आल्या आहेत. अद्याप ओलाची नवीन जनरेशन ओला एस १ प्रो आणि रोडस्टर मोटरसायकल बाजारात आलेली नाही. याचा फटका कंपनीला बसत आहे. या दोन बाईक बाजारात आल्या तर चेतकला पहिला नंबर मिळविताना पुरते झगडावे लागणार आहे.
एथरने १४,४४७ युनिट्स विकले आहेत. हिरो विडाला ६,५३९ युनिट्सच विकता आले आहेत. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने ही आकडेवारी जारी केली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षी ईव्ही दुचाकींच्या विक्रीत ६ टक्क्यांची घट झाली आहे. ही विक्री ४,४४,६७४ युनिट्सवरून १३,५३,२८० युनिट्सवर आली आहे. उलट या वर्षी ईव्हीच्या किंमतीत घट झाली आहे. तरीही ईव्ही दुचाकींच्या विक्रीत घट झाली आहे.
कारणे काय?
ईलेक्ट्रीक दुचाकी बनविणाऱ्या कंपन्यांना अद्यापही सर्व्हिस सुधारता आलेली नाही. ओलाच नाही तर बजाजची सर्व्हिसही अत्यंत वाईट आहे. एकदा स्कूटर दिली की ती १४ ते १७ दिवस परत मिळत नाहीय. एका दिवसाच्या सर्व्हिसला किंवा दुरुस्तीला एवढा मोठा कालावधी जात आहे. ओलाचेही तसेच होत असल्याने अनेकजण या कंपन्यांच्या स्कूटर घेण्यास टाळाटाळ करत आहेत. होंडाची अॅक्टीव्हा ई नुकतीच आली आहे, या स्कूटरच्या काही लिमिटेशन आहेत. यामुळे या स्कूटरलाही बाजारात पाय पसरणे तेवढे सोपे राहिलेले नाहीय. एथरला सर्व्हिस चांगली असली तरी विक्री काही वाढविता आलेली नाही.