Electric Car: भारतात सात लाख रुपयांनी स्वस्त झाली ईलेक्ट्रीक कार; मिळते लाईफ टाईम मोफत सर्व्हिस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 17:44 IST2022-04-18T17:44:19+5:302022-04-18T17:44:39+5:30
चिप संकट आणि वाढलेली महागाईमुळे कंपन्या पेट्रोल, डिझेलवरील कारच्या किंमती वाढवू लागल्या आहेत. असे असताना एक अशी कंपनी आहे जिने तब्बल सात लाखांनी कारची किंमत कमी केली आहे.

Electric Car: भारतात सात लाख रुपयांनी स्वस्त झाली ईलेक्ट्रीक कार; मिळते लाईफ टाईम मोफत सर्व्हिस
जगभरात सध्या ईलेक्ट्रीक वाहनांना मागणी वाढू लागली आहे. चिप संकट आणि वाढलेली महागाईमुळे कंपन्या पेट्रोल, डिझेलवरील कारच्या किंमती वाढवू लागल्या आहेत. असे असताना एक अशी कंपनी आहे जिने तब्बल सात लाखांनी कारची किंमत कमी केली आहे.
मर्सिडीज-बेंझने भारतातील त्यांची पहिली बॅटरी-इलेक्ट्रीक कार EQC च्या किंमतीत घट केली आहे. मर्सिडीजने ही कार सात लाख रुपयांच्या डिस्काऊंटवर उपलब्ध केली आहे. आता ही कार ९९.५ लाख रुपयांना एक्स शोरुम मिळू लागली आहे. ही किंमत २०२० च्या लाँचिंगएवढी आहे.
मर्सिडीजने २०२० मध्ये ९९.३० लाखांना ही कार लाँच केली होती. यानंतर दोनदा या कारच्या किंमतीत वाढ केली. यामुळे या कारची किंमत 1.06 कोटी रुपये झाली. या कारमध्ये 80-kWh चे मोठे बॅटरी पॅक मिळते. यामध्ये 20.8-19.7kWh/100 KM इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. ही मोटर 760 एनएम पीक टॉर्क आणि 402.3 bhp ताकद निर्माण करते. ही एसयुव्ही 5.1 सेकंदांत १०० किमीचा वेग पकडते. या कारचा टॉप स्पीड 180 किमी/तास आहे.
EQC एका पूर्ण चार्जवर 471 किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. यासह, होम चार्जिंग, एसी वॉल आउटलेट आणि जलद चार्जिंगसाठी तीन चार्जिंग पर्याय उपलब्ध आहेत. फास्ट-चार्जिंगला 90 मिनिटांत फुल चार्ज होते. मात्र, होम चार्जिंगसाठी २१ तास लागतात. कारण तो 2.4 kWh स्कूटरला वापरला जाणारा चार्जर असतो.
EQC मध्ये लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. मर्सिडीज या कारवर लाईफ टाईम सर्व्हिस फ्री देते. तर बॅटरीवर 8 वर्षांची किंवा 1.6 लाख किमी रेंजची वॉरंटी मिळते.