Electric Car: मारुती ई-विटारा की टाटा कर्व्ह इव्ही, किंमत एकसारखीच, पण कुठली भारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 17:49 IST2026-03-05T17:47:52+5:302026-03-05T17:49:24+5:30

Maruti E-Vitara vs Tata Curvv EV: भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची स्पर्धा आता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक कार टाटा कर्व्ह ईव्ही आणि मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ई-विटारा यांच्यात सध्या मोठी चुरस पाहायला मिळत आहे.

Electric Car: Maruti e-Vitara or Tata Curve EV, same price, but which one is heavier? | Electric Car: मारुती ई-विटारा की टाटा कर्व्ह इव्ही, किंमत एकसारखीच, पण कुठली भारी?

Electric Car: मारुती ई-विटारा की टाटा कर्व्ह इव्ही, किंमत एकसारखीच, पण कुठली भारी?

भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांची स्पर्धा आता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या इलेक्ट्रिक कार टाटा कर्व्ह ईव्ही आणि मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही ई-विटारा यांच्यात सध्या मोठी चुरस पाहायला मिळत आहे. दोन्ही कारची किंमत एकसारखीच आहे. त्यामुळे २० लाख रुपयांच्या बजेटमध्ये इलेक्ट्रिक वाहन शोधणाऱ्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 

मारुती ई विटारा: इंटिरिअर

मारुती ई विटाराचे ड्रायव्हर सीट १० वेगवेगळ्या प्रकारे अॅडजस्ट करता येते. स्टीअरिंग व्हील चालकानुसार वर- खाली किंवा मागे-पुढे हलवता येते. मागील सीट देखील मागे-पुढे हलवता येतात. कारमध्ये एक उत्कृष्ट ऑडिओ सिस्टम देखील आहे. फोन चार्जिंगसाठी त्यात चार यूएसबी पोर्ट देखील मिळतात. 

टाटा कर्व्ह: इंटिरिअर

टाटा कर्वमध्ये मारुतीपेक्षा मोठी टचस्क्रीन देण्यात आली आहे, ज्यामुळे मॅप पाहणे सोपे होते. या कारमध्ये पूर्णपणे लेदर सीट्स आहेत. याव्यतिरिक्त, त्यात दोन भागांचे पॅनोरॅमिक सनरूफ आहे, ज्यामुळे केबिन प्रीमियम वाटते. मागील सीटवर सनशेड्स मिळतात.

मारुती ई विटारा: सेफ्टी फीचर्स

ऑटोकार इंडियाच्या मते, दोन्ही मॉडेल्समध्ये उत्कृष्ट सेक्युरिटी फीचर्स मिळतात. परंतु मारुतीमध्ये टाटाच्या तुलनेत या कारमध्ये अतिरिक्त एअरबॅग आहे. या कारमध्ये लेव्हल 2 ADAS कॅमेरे देखील आहेत, जे वाहन जवळ येत असल्यास आपोआप ब्रेक लावू शकतात. शिवाय, या कारमध्ये अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, फ्रंट टक्कर वॉर्निंग, ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट वॉर्निंग, रियर क्रॉस-ट्रॅफिक अलर्ट, लेन-डिपार्चर वॉर्निंगसह लेन-डिपार्चर प्रिव्हेंशन आणि अ‍ॅडॉप्टिव्ह हाय-बीम असिस्ट यांसारखे फीचर्स मिळतात.

टाटा कर्व्ह: सेफ्टी फीचर्स

टाटा कर्व्ह ADAS फीचर्स मिळत नाहीत. ही कार उंच टेकड्या किंवा उतारावरून धावण्यासाठी उपयुक्त आहे. कारण ते कारचा वेग आपोआप नियंत्रित करते. दोन्ही कारमध्ये बिल्ट-इन डॅशकॅम हे फीचर्स देण्यात आले नाही, सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे मानले जाते, यासाठी ग्राहकांना अधिक पैसे द्यावे लागतात.

किंमत किती? 

मारुती ई विटाराची किंमत ₹१९.७९ लाख ते ₹२०.०१ लाख (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. तर, टाटा कर्व्ह ईव्ही (अ‍ॅकम्प्लिश्ड+ एस) ची किंमत ₹१९.९९ लाख (एक्स-शोरूम) आहे. जर तुम्हाला स्टायलिश दिसणारी आणि उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये देणारी इलेक्ट्रिक कार हवी असेल, तर टाटा कर्व्ह ईव्ही चांगला पर्याय आहे.

Web Title : इलेक्ट्रिक कारें: मारुति ई-विटारा बनाम टाटा कर्व ईवी - कौन है बेहतर?

Web Summary : भारत के इलेक्ट्रिक कार बाजार में मारुति ई-विटारा और टाटा कर्व ईवी के बीच टक्कर है। दोनों की कीमत लगभग ₹20 लाख है। मारुति अधिक एयरबैग और ADAS प्रदान करती है, जबकि टाटा का इंटीरियर प्रीमियम है। चुनाव सुरक्षा या स्टाइल की प्राथमिकता पर निर्भर करता है।

Web Title : Electric Cars: Maruti e-Vitara vs. Tata Curvv EV - Which Wins?

Web Summary : Maruti e-Vitara and Tata Curvv EV compete in India's electric car market. Both priced similarly around ₹20 lakhs, Maruti offers more airbags and ADAS, while Tata boasts a premium interior. Choice depends on safety versus style preference.