जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 16:52 IST2025-11-06T16:50:47+5:302025-11-06T16:52:03+5:30
फेस्टीव्ह सिझनवेळी नवरात्रीपासून केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपात लागू केली होती. त्याचा बंपर फायदा ग्राहकांसोबतच कंपन्यांना देखील झाला आहे. यातच आता या काळात बनविलेल्या गाड्यांचा स्टॉक रिकामा करण्यासाठी कंपन्यांनी नोव्हेंबरपासूनच कंबर कसली आहे.

जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
ऑटोमोबाईल बाजारात सध्या डिस्काऊंटचा पाऊस सुरु झाला आहे. फेस्टीव्ह सिझनवेळी नवरात्रीपासून केंद्र सरकारने जीएसटीमध्ये कपात लागू केली होती. त्याचा बंपर फायदा ग्राहकांसोबतच कंपन्यांना देखील झाला आहे. यातच आता या काळात बनविलेल्या गाड्यांचा स्टॉक रिकामा करण्यासाठी कंपन्यांनी नोव्हेंबरपासूनच कंबर कसली आहे.
टाटा, महिंद्रा, फोक्सवॅगन, होंडासह सर्वच कार कंपन्यांनी स्टॉक क्लिअरन्स सेल सुरु केला आहे. मारुती नेक्साने इग्निसवर 57 हजार रुपये, बलेनोवर 47 हजार रुपये, फ्रॉन्क्सवर 78 हजार रुपयांचा डिस्काऊंट जारी केला आहे. Maruti Arena ने Alto K10 वर 52100 रुपये, एस प्रेसोवर 52100 रुपये, वॅगन आरवर 62100 रुपये, स्वि्फ्टवर 57100 रुपयांचा डिस्काऊंट जारी केला आहे.
होंडाने Elevate वर 1.56 लाख रुपये, सिटीवर 1.52 लाख रुपये, अमेझवर 95,000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट जारी केला आहे. टाटा मोटर्सच्या कारवर देखील डिस्काऊंट जाहीर झाला असून ईव्ही सेगमेंटमध्ये टियागो ईव्ही 70,000 रुपये, पंच ईव्ही ६० हजार रुपये, नेक्सॉन ईव्हीवर ३० हजार, तर कर्व्हवर १.३० हजारांचा डिस्काऊंट जारी केला आहे. तर इंधनावरील कार टियागोवर २५००० रुपये, टिगॉर ३० हजार, अल्ट्रॉझ ६५०००, पंच ४० हजार, नेक्सॉन ४५ हजार असा डिस्काऊंट जारी केला आहे.
जर्मन कंपनी फोक्सवॅगनने प्रीमियम सेगमेंटमधील स्टॉक क्लीअर करण्यासाठी ₹ ३ लाखांपर्यंत मोठी सूट जाहीर केली आहे. Tiguan R Line ₹ ३,००,००० पर्यंत डिस्काऊंट जाहीर केला आहे. टायगून ₹ १.९५ लाख पर्यंत, Virtus ₹ १.५६ लाख पर्यंत डिस्काऊंट जारी करण्यात आला आहे.