देसी जुगाड! पठ्ठ्यानं चक्क भंगार आणि लाकडापासून बनवली इलेक्ट्रिक बुलेट, पाहा Video...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 20:55 IST2023-03-24T20:54:57+5:302023-03-24T20:55:47+5:30

तुम्ही आतापर्यंत देसी EV चे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, पण हा अनोखा आहे.

Desi Jugad! Electric bullet made from scraps and wood, watch Video... | देसी जुगाड! पठ्ठ्यानं चक्क भंगार आणि लाकडापासून बनवली इलेक्ट्रिक बुलेट, पाहा Video...

देसी जुगाड! पठ्ठ्यानं चक्क भंगार आणि लाकडापासून बनवली इलेक्ट्रिक बुलेट, पाहा Video...

Electric Bullet: गेल्या एक दोन वर्षांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढली आहे. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहने बनवत आहेत. यातच काही जुगाडी लोक घरातच टाकाऊ वस्तुंचा वापर करुन इलेक्ट्रिक टू-व्हिलर बनवतात. अशा जुगाडशी संबंधित अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर खूप पाहिले जातात. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका व्यक्तीने चक्क भंगार सामान आणि लाकडापासून इलेक्ट्रिक बुलेट (Electric Bullet) बनवली आहे. 

व्हायरल व्हिडिओ पंजाबचा असून, यात एक तरुण त्याच्या इलेक्ट्रिक बुलेटवर बसलेला दिसत आहे. ही गाडी दिसायला बुलेटप्रमाणेच असून, यातमध्ये लाकडाचाही वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या तरुणाने बुलेटसारखा आवाज येण्यासाठी त्याच्या गाडीमध्ये स्पिकरही बसवला आहे. तसेच, डमी सायलेंसर लावल्यामुळे ही खरीखुरी बुलेटच वाटते. त्याचा व्हिडिओ 40 लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.

पाहा Video:- 

विशेष म्हणजे, त्या व्यक्तीने पेट्रोल टाकीच्याजागी म्युझिक सिस्टीम बसवली आहे. याशिवाय इंजिनच्या जागी चार्जेबल बॅटरी बसवण्यात आली आहे. लोक कमेंट्समध्ये या देसी जुगाडचे खूप कौतुक करत आहेत. हे फक्त भारतीयच करू शकतात असे नेटकरी म्हणत आहेत. तसेच, काहींनी हा जुगाड देशाबाहेर जाता कामा नये, असेही म्हटले. एकंदरीतच लोकांना जुगाडची ही बुलेट आवडली असून त्यावर विविध कमेंट्स येत आहेत.


 

Web Title: Desi Jugad! Electric bullet made from scraps and wood, watch Video...