हायटेक फिचर्स असलेली Deltic Drixx इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 100 KM रेंजचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 14:20 IST2023-02-04T14:19:20+5:302023-02-04T14:20:10+5:30
Deltic Drixx : जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर डेल्टिक ड्रिक्स इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज, टॉप स्पीड, ब्रेकिंग सिस्टम यासह सर्वकाही जाणून घ्या...

हायटेक फिचर्स असलेली Deltic Drixx इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जमध्ये 100 KM रेंजचा दावा
नवी दिल्ली : सध्या इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढताना दिसून येत आहे. यातच अशी एक इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी तुमच्यासाठी कमी बजेटमध्ये जास्त रेंज देऊ शकेल. ही Deltic Drixx इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कमी बजेटमध्ये जास्त रेंज, हलके वजन आणि फीचर्समुळे या इलेक्ट्रिक स्कूटरला बाजारात चांगली मागणी आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर डेल्टिक ड्रिक्स इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत, रेंज, टॉप स्पीड, ब्रेकिंग सिस्टम यासह सर्वकाही जाणून घ्या...
किंमत किती?
डेल्टिक इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 55,490 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि टॉप मॉडेलपर्यंत जाऊन या स्कूटरची किंमत 71,990 रुपये होईल.
स्कूटरची बॅटरी
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने 60.8 V, 26Ah क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे. या बॅटरीमध्ये 250 W पॉवरची BLDC इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे. या बॅटरी पॅकवर कंपनी 3 वर्षांची वॉरंटी देते.
राइडिंग रेंज आणि टॉप स्पीड
कंपनीचा दावा आहे की, एकदा फुल चार्ज केल्यावर ही स्कूटर 70 ते 100 किलोमीटरची रेंज देते आणि या रेंजसोबत कंपनी ताशी 25 किलोमीटरच्या टॉप स्पीडचा दावा करते.
ब्रेकिंग सिस्टम
ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर, कंपनीने स्कूटरच्या फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हीलमध्ये ड्रम ब्रेक्स बसवले आहेत, ज्यात कॉम्बी ब्रेकिंग सिस्टीम देण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टीम बद्दल बोलायचे झाले तर स्कूटरच्या फ्रंटमध्ये हायड्रॉलिक टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि रिअरमध्ये हायड्रॉलिक स्प्रिंग मोनोशॉक सस्पेन्शन आहे.
फीचर्स काय आहेत?
डेल्टिक ड्रिक्सवर ऑफर केलेल्या फीचर्समध्ये रिमोट स्टार्ट, पुश बटन स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, अँटी थेफ्ट अलार्म, यूएसबी चार्जिंग पोर्ट, डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल ओडोमीटर, सेंट्रल लॉकिंग, फाइंग माय स्कूटर, रिव्हर्स मोशन स्विच, कीलेस स्टार्ट अँड स्टॉप, एलईडी हेड लाइट, एलईडी टेल लाइट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प आणि डीआरएल यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.